पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी आल्याखेरीज तिथून हलू नका, असं निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फोनवर सांगितलं होतं. अंतराचा विचार करता ते खूपच लवकर जुळेवाडीत पोहोचले आणि सर्वसाधारण तपासणी असल्याचं भासवून कागदपत्रं तपासायला सुरुवात केली. हा सगळा स्टिंग ऑपरेशनचा परिणाम आहे, हे त्यांनी चेहऱ्यावर दिसूही दिलं नाही. पीसीपीएनडीटी कायद्याच्या सल्लागार समितीची मी सदस्य असल्यामुळं मी ओळखपत्र दाखवून त्यांना तपासणीसाठी अधिकृतरीत्या मदत करू शकत होते. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी डॉक्टरांना पेशंटचा (कविताचा) कन्सेन्ट दाखवायला सांगितला. पण डॉक्टर तो देऊ शकले नाहीत. अखेर अधिकाऱ्यांनी डॉक्टरांच्या टेबलाचा ड्रॉव्हर उघडून नोटा बाहेर काढल्या आणि प्रतिज्ञापत्रात वर्णन केल्याप्रमाणंच त्या आहेत का, याची तपासणी सुरू केली, तेव्हा आपण जाळ्यात अडकल्याचं डॉक्टरांना समजलं.

 हे सगळं सुरू असताना पत्रकार मित्रानं क-हाडहून पत्रकारांना बोलावून घेतलं होतं. अधिकाऱ्यांची गाडीही त्यानं त्यासाठी पाठवली होती. दोन गाड्याभरून पत्रकार आल्यानंतर सगळ्यांची तारांबळ उडाली. पत्रकारांचा नेहमीप्रमाणं पहिला प्रश्न, 'डॉक्टरांना अटक होणार का, असाच होता. पोलिस तर कुठेच दिसेनात. परंतु अशी प्रकरणं 'सरकारी अधिकाऱ्यांनी दाखल केलेला फौजदारी गुन्हा या गटात मोडतात, असं पत्रकारांना समजावून सांगितलं. स्टिंग ऑपरेशनमध्ये सगळे पुरावे हाताशी आलेले असतात. अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तपास संपलेला असतो. त्यामुळं तपासासाठी म्हणून आरोपीला ताब्यात घेण्यात अर्थच नसतो. तपासात अवघे सात मुद्दे असतात आणि त्यांची उत्तरं मिळाली, की तपास पूर्ण होतो. त्यानंतर रोपीकडून समाजाला धोका आहे, असं जर न्यायालयाला वाटलं, तरच त्याला अटक करून न्यायालयीन कोठडी दिली जाते. आपल्याकडे माध्यमांसह सगळेजण अटकेबद्दल आग्रही असतात; परंतु खरं तर आरोपीला शिक्षा व्हावी, यासाठी आग्रही असायला हवं. एखादं प्रकरण घडल्यानंतर तपासातल्या प्रगतीवर लक्ष ठेवायला हवं. खटले लवकरात लवकर निकाली निघायला हवेत. अशा प्रकारचा खटला उभा राहिल्यानंतर सुनावणीसाठी अवघे सहा-सात दिवस पुरेसे असतात; पण

६८