पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/६९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करायचा नाही. आपण संघर्ष एन्जॉय करायचा. तो आम्ही भरभरून एन्जॉय केला होता. शिवाय निकालही आमच्या मनाजोगा लागला. पण या सगळ्या प्रकरणाची नायिका ठरली ती रेखा... गरिबीत राहणारी. मोलमजुरी करून जगणारी; पण लाख रुपयांचं पुडकं परत करणारी. साक्ष देताना तंबाखू मागणारी आणि 'नवऱ्याला सांगू नका, असं म्हणणारी. तिच्या नवऱ्याला मुळातच ऐकू कमी येतं. पण तरीही आम्ही त्याला रेखानं तंबाखू मागितल्याचं सांगितलेलं नाही. आजअखेर!

६५