पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/६७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फोन आला होता. रेखाची साक्ष दुसऱ्या दिवशी होती. परंतु माझ्या कार्यक्रमामुळं आम्ही पुढची तारीख घेणार होतो. पण कशी कुणास ठाऊक, रेखा शिराळ्यात दाखल झाली होती. 'आलेच आहे तर जबाब देऊन टाकते, असं म्हणत होती. काहीतरी गडबड होती. सरकारी वकिलांशी मी फोनवरून बोलले. न्यायालयात तिला ओळखायचंच नाही, असं ठरलं. एवढं झाल्यावर मी सोलापूरहून तातडीनं निघाले. रेखाच्या सासूची बहीण पेठनाका येथे राहते, हे माहीत होतं. पेठनाक्यालाच शिराळ्याच्या डॉक्टरीण बाईंचा मोठा बंगला होता. खटला भुसभुशीत करण्याचे प्रयत्न सुरू झालेत आणि रेखाचा त्यासाठी वापर होतोय, हे समजायला वेळ लागला नाही. रेखाच्या नवऱ्याला फोन केला. तो शिर्डीला गेला होता. तिथून त्यानं रेखाला फोन केला. रेखानं नवऱ्याला आपण पेठनाक्याला आलोय, असं कळवलं होतं. मला पैसे दिले जातायत, हेही सांगितलं होतं. रेखाचा नवरा प्रामाणिक. त्यानं मला तेही सांगून टाकलं. तो स्वतः शिर्डीहून तातडीनं निघाला.

 शैलाताई, माया आणि इतर कार्यकर्ते साताऱ्याहून पेठनाक्याला पोहोचले. मीही इस्लामपूरमार्गे पेठनाक्याला पोहोचले होते. रेखाच्या सासूच्या बहिणीच्या घरी आम्ही रेखाला भेटलो. रेखाची सासू आणि तिच्या बहिणीनं पैशांसाठी हा कारभार केलाय, हे तिथल्या चर्चेतून उघड झालं. वकिलांना आणि पोलिसांना आम्ही हा प्रकार कळवला. रेखाला घेऊन आम्ही पेठनाक्याच्या मणिकंडन हॉटेलवर आलो. लाख रुपयांचं बंडल घेऊन रेखा आली होती. ते पुडकं तिनं पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी रेखाचा जबाब घेतला. कोर्टातही अॅफिडेव्हिट दिलं. दरम्यानच्या काळात शिराळ्याच्या डॉक्टरीण बाई पोलिसांपुढे हजर होऊन जामिनावर सुटल्या होत्या. कोर्टानं त्यांचा जामीन रद्द केला आणि दोन दिवस पुन्हा तुरुंगात टाकलं. साक्षीदारांवर दबाव आणणं आणि लाच देणं असा आणखी एक गुन्हा त्यांच्यावर कोर्टानंच दाखल केला.

 सऱ्याच दिवशी रेखाची साक्ष होती. तिच्याकडून वकिलांनी तयारी करून घेतली. नीट जबाब देता येईल ना, याची चाचपणी केली. पण रेखानं वेगळाच हट्ट धरला. तिला तंबाखूची सवय होती. 'तंबाखू खाल्ली नाही तर मला बोलता येणार नाही,म असं ती सांगू लागली. गावापासून न्यायालय खूप

६३