पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/६६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिराळ्याच्या डॉक्टरीण बाईंचं सोनोग्राफी मशीन तिच्याच नावावर होतं. पण ताकारीच्या डॉक्टरांचं मशीन मात्र क-हाडच्या एका रेडिओलॉजिस्टच्या नावावर असल्याचं आढळलं. त्यांनाही पोलिसांनी बोलावून घेतलं. अशी बेकायदा काम करणाऱ्यांची गाढवावरून धिंड काढण्याची भाषा करणाऱ्या गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात एकही माणूस सापडणं शक्य वाटत नव्हतं. प्रत्यक्षात सहाजण सापडले. चार डॉक्टर आणि दोन एजंट. एकावर पाच फ्री!

 शिराळ्याच्या डॉक्टरीण बाई पळून गेल्यावर त्यांच्या नवऱ्याला म्हणजे कोकरूडच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. जाबजबाब व कारवाई संपवून सगळ्या आरोपींना घेऊन सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो. जाताना दोनदा लघवीचं कारण सांगून कोकरूडचे वैद्यकीय अधिकारी उतरले. 'आता मी आत्महत्याच करतो, असं सांगून पळून जायचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना जाऊ दिलं नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही पोहोचलो, तेव्हा मात्र ते पळाले ते पळालेच.

 एवढं सगळं घडल्यानंतर आमच्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले. तीन टीम साताऱ्यात आल्या. रेखाला, मला, कार्यकत्यांना आमिषं दाखवायचे प्रयत्न सुरू झाले. दरम्यानच्या काळात इस्लामपुरात एक खून झाला होता. आम्ही इस्लामपुरात आल्यावर आमचीही तशीच गत होईल, अशा धमक्या सुरू झाल्या. एकंदर पकडलेल्या डॉक्टरांना पाठीशी घालायला भलेभले रिंगणात उतरलेत, हे स्पष्ट होत होतं. अशा वेळी खटला दाखल कसा करायचा? अखेर आम्ही इस्लामपुरातल्या महिला संघटना, आशा संघटना यांच्याशी संपर्क साधला. दाव्याचे कागदपत्र आणि सोनोग्राफी मशीन पालखीत घातलं आणि भजन म्हणत कोर्टापर्यंत गेलो. तिथं सरकारी वकिलांच्या ताब्यात कागदपत्रं दिली. स्लामपूरप्रमाणंच शिराळा न्यायालयाच्या अधिकारकक्षेतही गुन्हा घडला होता. त्यामुळं तिथंही खटल्याची कारवाई सुरू झाली.

 दरम्यान, मी एका कार्यक्रमासाठी कैलासला सोबत घेऊन सोलापूरला गेले होते. तेव्हा शैलाताईंचा फोन आला. त्यांना शिराळ्याच्या सरकारी वकिलांचा

६२