पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुसऱ्या दिवशी दोन्ही पेशंटना घेऊन शैलाताई (विमल पाटील) हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. वीस हजार रुपये कम्पाउंडरला दिले. पण पैसे दिल्याचं लेखी द्या, असा आग्रह धरला. 'घरी विचारलं तर काय सांगू, असं म्हणाल्या. कम्पाउंडरनं साध्या कागदावर वीस हजार रुपये मिळाल्याचं लिहून दिलं. त्याची सही, तारीख, फोन नंबर हे सगळं रेकॉर्डवर येत होतं आणि त्याला पत्ताच नव्हता. 'मी आणि माझा मित्र आता तुम्हाला सोबत घेऊन जाणार, असं त्यानं सांगितलं. त्याच्या मित्रासह या तिघींना त्यानं सोबत घेतलं आणि एसटीनं निघाला. मी, कैलास, अनिता यांच्यासह चार कार्यकर्ते गाडीतून त्या एसटीचा पाठलाग करू लागलो. शैलाताई आणि मी एकमेकांना एसएमएस करत होतो. कुणालाही शंका येऊ न देता शैलाताईंना हे सगळं करावं लागत होतं. फोन करण्याऐवजी एसएमएस हा त्याचाच भाग. कोणत्या एसटीत बसलो, किती वाजता निघाली, कुठपर्यंत पोहोचलो, हे सगळं शैलाताई मला मेसेजद्वारे कळवत होत्या.

 कम्पाउंडर आणि त्याच्या मित्रानं तिघींना ताकारीला एका दवाखान्यात नेलं. नवरा-बायको दोघेही डॉक्टर दवाखान्यात दोन्ही पेशंटना आणि शैलाताईंना खूप वेळ बसवून ठेवलं गेलं. अशा वेळी चिडचीड होऊन देता शांत राहणं भाग असतं. संशय येता कामा नये. हालचाली टिपल्या जात असतात. आपल्याला खरंच गरज आहे, असे भाव घेऊन तासन्तास बसावं लागतं. डॉक्टरीण बाई आल्यावर दोघींची सोनोग्राफी झाली. सुनीताचा गर्भ लहान आहे आणि काही दिवस वाट पाहावी लागेल, असं त्यांनी सांगितलं. रेखाचा गर्भ 'चिकित्सेला योग्य होता; पण दुसऱ्या डॉक्टरांकडून कन्फर्म करून घेऊ, असं उत्तर मिळालं. खरं तर ही कार्यकत्यांची परीक्षाच होती. सुनीताला डॉक्टर स्वतःच दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन जाणार होते. पण संध्याकाळपर्यंत त्यांनी सगळ्यांना बसवून ठेवलं आणि अखेर 'उद्या या,असं सांगितलं.

 दुसरा दिवसही वाट बघण्यातच वाया गेला. संयमाची कसोटी होती. आमच्यात एसएमएस सुरूच होते. शिवाय, ताकारीसारख्या गावात मुक्काम कसा करणार? साताऱ्याहून जाऊन-येऊन सगळं करावं लागत होतं. दोन

५८