पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/५२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अचानक झालेल्या कारवाईमुळं डॉक्टर अक्षरशः रडायला लागले. हे सगळं होईपर्यंत यांच्या पत्नी साताऱ्याहून धावत आल्या. त्याही गयावया करू लागल्या. त्याही पेशानं डॉक्टर. “सोनोग्राफी मशीनवर आमचं पोट आहे, ते सील करू नका, अशी विनवणी नवरा-बायको करू लागले. दरम्यान, या कारवाईत आम्हाला भक्कम ऑडिओ पुरावा मिळाला होता. सोबत आणलेला हँडीकॅम पुसेगावातल्या मंडळींजवळच राहिला होता. पण शूटिंग करणारा कार्यकर्ता आमच्यासोबतच होता. त्यानं सगळं शूटिंग करून घेतलं. डॉक्टरांना दिलेल्या नोटा जप्त झाल्या. मशीन सील झालं आणि आम्ही सातारला आलो. दिवसात दोन स्टिंग ऑपरेशन फत्ते झाली होती.

 आपल्याकडे गुन्हे करणाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी एवढी सगळी मेहनत करावी लागते. एवढं मनुष्यबळ राबत असतं गैरप्रकार रोखण्यासाठी... पण दुर्दैवानं, त्याहून अधिक मेहनत घ्यावी लागते गुन्हे करणाऱ्यांना गुन्हेगार शाबीत करण्यासाठी. कोर्टात खटला उभा राहीपर्यंत अनेक धक्के बसत असतात. पण हे धक्केच आपल्याला बरंच काही शिकवत असतात. आपली कार्यपद्धती अधिकाधिक निर्दोष होते, ती अशा धक्यांमुळंच! याही प्रकरणात तसे धक्के बसलेच. दवाखान्याचं चित्रीकरण केलेल्या सीडीची अन्एडिटेड कॉपी पुरावा म्हणून सादर करावी लागते. आमच्याकडे सीडी होती. पण कशी मग व्हिडिओ पुरावा कोर्टात सादरच करायचा नाही, असं आम्ही ठरवलं आणि एक महत्त्वाचा निर्णय घेतला. यापुढे कोणत्याही स्टिंग ऑपरेशनच्या वेळी सीडी आधी आपल्या ताब्यात घ्यायची. या प्रकरणानं दिलेला आणखी एक धडा म्हणजे, स्टिंग ऑपरेशनसाठी ज्या गर्भवती महिलेची मदत घेतली असेल, तिचा पत्ता रेकॉर्डवर आणायचाच नाही. मुक्तांगणचाच पत्ता द्यायचा.

 प्रचंड कष्ट केल्यानंतर न्यायालयात जेव्हा साक्षीदार फितूर होतो तो क्षण कसा असतो, हे फक्त आमच्या कष्टाळू कार्यकत्यांनाच माहीत आहे. असं स्टिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या गर्भवतीनं जेव्हा सांगितलं, तो क्षण असाच होता. सातव्या महिन्यातच बाळंत झाल्यामुळं आपली नवजात मुलगी वारली, असं तिनं कोर्टात सांगितलं. इतर साक्षीदारांना ओळखायलाही

४८