आणि त्यातल्या कागदपत्रांच्या झेरॉक्स काढून घेतल्या. बायडाबाई आणि शैलाताई गर्भवती महिलेसोबत हॉस्पिटलमध्ये होत्या. त्याच आमच्या साक्षीदार.
सिव्हिल सर्जन येईपर्यंत अनेकांशी बोलून आम्ही काही माहिती मिळवली होती आणि ती धक्कादायक होती. डॉक्टरांकडे गर्भलिंगनिदान करण्यासाठी बायकांना घेऊन येणाऱ्यांमध्ये त्या भागातल्या शिक्षकांची संख्या जास्त होती. खटावच्या एका कॉलेजचा शिपाईच शिक्षकांना तिथं घेऊन यायचा. कोणत्याही शिक्षकाला तिसरं मूल झालं तर नियमानुसार त्याची नोकरी जाते. म्हणजे, दोनच मुलांवर थांबायला हवं आणि त्यात एखादा
मुलगा हवाच! डॉक्टरांचे वडीलही शिक्षकच आहेत, अशीही माहिती मिळाली. म्हणजेच, मोठ्या हुशारीनं नेटवर्क तयार केल्याचं दिसत होतं.
आमच्या पेशंटचा नंबर आला, तेव्हा शैलाताई आणि बायडा मावशी तिच्याबरोबर आत गेल्या. शैलाताई खरंतर तिच्या नातेवाईक वाटत नव्हत्या, पण संशय येऊनसुद्धा डॉक्टरांनी कन्सेन्ट घेतली नाही. तपासणी केली आणि तिच्या पोटात मुलगी आहे, असं सांगितलं. तेवढ्या वेळात सिव्हिल सर्जन पुसेगावात पोहोचले होते. इशाऱ्याचा मेसेज येताच त्यांना घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टरांनी सिव्हिल सर्जनना, का आलाय, असं
विचारलं, तेव्हा इन्स्पेक्शनसाठी आलोय, असं ते म्हणाले. मग डॉक्टरांनी आम्हा सगळ्यांना कोल्ड्रिंक पाजलं. सकाळपासून किती सोनोग्राफी झाल्या, असं सिव्हिल सर्जननी डॉक्टरांना विचारलं. दोन-तीनच सोनोग्राफी झाल्यात, असं त्यांनी सांगितलं. पण, इकडे कैलासच्या हातात मात्र दहा-बारा कागद जमले होते. पेशंटच्या फायलींमधून झेरॉक्स काढून घेतलेले! हॉस्पिटलमधलं रेकॉर्ड तपासलं, तेव्हा यापैकी एकाही सोनोग्राफीचं रेकॉर्डच ठेवलं नाहीये, हे
लक्षात आलं. आमच्या पेशंटचे तर कोणतेही कागदपत्र नव्हते, पण तिला सोनोग्राफीचा रिपोर्ट मात्र दिला होता. कैलासकडे जमलेल्या कागदपत्रांनुसार पेशंटचं रेकॉर्ड हॉस्पिटलनं ठेवलेलं नव्हतं, म्हणजेच काहीतरी गडबड आहे, हे स्पष्ट होतं.
मग आम्ही पेशंटला आणि शैलाताईंना डॉक्टरांच्या केबिनमध्ये बोलावलं, तेव्हा तर डॉक्टरांनी कहरच केला. आमच्या पेशंटची सोनोग्राफी आपण केलीच नाही, असं ते म्हणू लागले. कन्सेन्ट तर घेतलाच नव्हता. पण