पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही, असं त्यावेळी वाटलं होतं. परंतु मुलींना जन्म नाकारण्याबरोबरच अनेक प्रश्न या भागात होते. ते एकात एक गुंतलेले होते. या जिल्ह्यातले असे असंख्य प्रश्न पुढं आम्हाला या जिल्ह्यात घेऊन येतील आणि इथले हजारो लोक पुढं आमच्याशी घट्ट जोडले जातील, याची पुसटशीही शंका जिल्ह्याची सीमा ओलांडताना आम्हाला आली नव्हती. पण... त्या दिशेनं प्रवास सुरू झाला होता. गाडी धावत होती साताऱ्याकडे; पण आमचं डेस्टिनेशन होतं बीड! पुढे बीड जिल्ह्यातल्याच शिरूर-कासार परिसरात मुली वाचवण्याचं आणि बालविवाह रोखण्याचं काम आमच्याकडून सुरू झालं आणि पाहता-पाहता त्या कामाचा प्रचंड विस्तार झाला. गरीब घरातले असंख्य लोक आमच्याशी जोडले गेले. प्रश्नांची गुंतागुंत समजून घेणं, त्यानुसार कामाची पद्धत आणि फोकस बदलणं हे सगळं बीड जिल्ह्यानंच तर आम्हाला दिलं.

३५