पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/२९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 माझ्यासोबत आरोग्य अधिकारी होते. आम्ही सगळे दवाखान्यात गेलो. छापा टाकला. सर्व कागदपत्रे घेतली. डॉक्टरांची चौकशी केली आणि नोटा बाहेर काढण्यास सांगितले. त्या नोटा शर्वरीच्या अफिडेव्हिटवर नोदवलेल्या होत्या नोटांचे नंबर एक-एक वाचून दिलेल्या नोटा त्याचा आहेत, याची खात्री करुन घेतली. सर्व नोटा बाहेर काढायला लावल्या सोनोग्राफी मशील सील करण्याची प्रक्रिया सुरु झाली. पत्रकारांना काही कळवायचं नाही, असं त्या पत्रकार मैत्रिणीला सांगितलं होते. त्याच कारण असं की जर ही बातमी उद्या पेपरमध्ये छापूर आली तर ठाण्याचा डॉक्टर सावध होईल आणि त्यामुळं ठाण्यातील कारवाई फसेल. शांतपणे कारवाई केली. उशीर झाला मुद्देमाल जप्त करणं. पंचनामा, जबाजबाब घेणं. सोनोग्राफी मशीन सील करणं. साक्षीदाराच्या सह्या हे सगळं काम संपायला दहा साडेदहा झाले. मुद्देमाल आरोग्य अधिकाऱ्यांच्या ताब्यात देउन आमची गाडी पुन्हा पनवेलाच्या दिशेनं धावू लागली. दिवसभराच्या धावपळीने सगळेच थकून गेले होते. पण दुसऱ्या याचा आनंद होता. रात्री बारा वाजता आम्ही पनवेलला पोहोचलो. सकाळी पुन्हा लवकर उठायचं असल्यामुळे सगळे झोपून गेले. मेघा जागी होती. नेहमीप्रमाणे तिला उत्सुकता होती. जाणून घ्यायची. रात्री दोनपर्यंत मी आणि मेघा गप्पा मारत बसलो. दिवसभरात काय काय झालं यांच रिपोटिंग मी तिला केल.

 सकाळी सगळ्यांनी पटापट आवरलं कैलासला डॉक्टरांना फोन करायला सांगितलं. त्यांनी फोन करुन किती येऊ असं विचारलं. डॉक्टरांनी दिलेल्या वेळेनुसार आम्ही निघालो. कॅमेरे, ऑडिओ, सिस्टीम चार्ज करुन घेतली होती. शर्वरीला मी विचारलं. बरी आहेस ना ? कालचा दिवस खूप ताणाखाली गेला होता. प्रवासही खूप झाला होता. पण शर्वरी फ्रेश होती. आम्ही ठाण्याच्या दवाखान्यात बरोबर अकरा वाजता पोहोचलो. डॉक्टर वाट बघत होते. त्यानी शर्वरी आणि कैलासला केबिनमध्ये बोलावलं. ती कालची मुलगी सोबत नाही ना आली ? असं विचारलं. दोघांनी नकार दिला. तिला जरा मुंबईची माहिती आहे म्हणून काल सोबतीला आणलं आज ती नाही आली. असं उत्तर कैलासं दिलं. डॉक्टरांनी विचारलं "तू पोलिसात नाहीस ना ? मला तू तसा वाटतोस." कैलास म्हाणाला नाही हो. मी कुठला पोलीस- साधा गाडीचा व्यवसाय आहे माझा. डॉक्टरांनी लगेच पुढचा प्रश्न विचारला. “काल आलेली ती मुलगी मला पत्रकार वाटत होती." दोघांनीही एकमेकांकडे बघितलं शर्वरीन

२५