Jump to content

पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करु, मई हूंना." कैलासला सारखं मै हु ना" म्हणायचा. कैलास आणि भाईच्या गप्पा रंगात आल्याची संधी साधून सोबत आलेली ताई चक्क झोपून गेली. भाईनं प्रश्न विचारु नयेत म्हणून !

 हळूहळू एसटी सुरत शहराच्या जवळ आली. रस्त्यावरचे गुजराती बोर्ड दिसू लागले. तसा कैलास अलर्ट झाला. आम्ही मागे होतोच. शेवटी एसटी स्टॅण्डमध्ये गेली आणि गडबड झाली. कैलासचा संपर्क तुटला. कैलास कुठे गेला. हेच कळेना. फोन करावा तर भाईला संशय येणार. तिकडे एसटीमधून उतरल्यवर तिघे चहाला एका हॉटेलमध्ये गेले. कारण भाईला फोन करायचा होता. त्यानं फोन वरून डॉक्टरला माहिती दिली आणि चहा घेऊन ते स्टॅण्डपासून चालायला लागले. बऱ्याच वेळानं मेसेज आला- आम्ही रस्त्याने चालतो आहोत; परंतु ठिकाण सांगता येत नाही. कैलास गुजराती बोर्डही वाचता येईना. शेवटी त्याने भाईला" रिक्षा करुयात का" असं विचारलं तिघं रिक्षात बसले रिक्षावाल्यास कुठं जायचंय हे विचारले परंतु भाईलासुध्दा नीट पत्ता सांगता येईना. पुढे एका ठिकाणी रिक्षा थांबवली आणि भाई म्हणला," इथेच दवाखाना आहे. मी आलोच, तुम्ही थांबा !" असं म्हणून तो एका दवाखान्यात गेला. कैलासनं लगेच मला फोन लावला कुठे आहोत, असं त्यानं विचारलं तेव्हा मी त्याला समोरच्या रिक्षात बघायल्या सांगितलं. कैलासनं मला बघितलं आणि हुश्श झालं ! भाई डॉक्टरांना विचारायला गेलाय, असं कैलासनं मला सांगितलं. पण मला रिक्षात बघून कैलास जरा चाचपडलाच. त्याला काहीच कळेना. मी रिक्षातून कशी आले. हे त्याला ळेना. पण मी गाडी गर्दीतून निघत नसल्यामुळं आम्ही रिक्षा केल्याचं मी त्याला सांगितलं. रिक्षावाल्याला सांगितलं समोरच्या रिक्षाचा पाठलनाग करायचाय.

 भाई दवाखान्यातून बाहेर आला. डॉक्टर करायला तयार नाहीत, असं त्यांन कैलासला सांगितलं. झालं! सगळं मूळ केरात ! एवढा उपदव्याप करुन हाती काहीच नाही. कैलासही त्याच्यावर वैतागलना. तुम्हाला खात्री नव्हती तर कशाला आणलं एवढ्या लांब ? असं विचारलं. पण भाईसुध्दा नाराज झाला होता. आमच्या काळजीपोटी नव्हे, तर त्याला पैसे मिळणार नाहीत म्हणून ! पण तो थांबला नाही. तो कैलासला म्हणाला, “रुको, मेरी बहुत पहचान है, बहुत सारे डॉक्टर है. करता हूं कूछ" दोघांना चालतच त्यानं दुसऱ्या ठिकाणी नेलं. एका ठिकाणी थांबायला सांगितले जिना चढून दवाखान्यात गेला. पाच मिनिटांनी खाली आला. कैलासला आणि त्या ताईला वर बोलावलं डॉक्टरांनी केबिनबाहेर बसवलं. भाई केबिनमध्ये गेला. पंधरा मिनिटांनी ताईला आणि

१४