Jump to content

पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नंदूरबार ते सुरत


हॅलो - ०२१६२ - २२१०३१ नंबर ना ?
हो, बोला.
अॅड. वर्षा देशपांडे आहेत का? मी नंदुरबारहुन डॉक्टर बोलतोय. आहेत का वर्षाताई
मी: नमस्कार, बोला.
आवाज : नमस्ते ताई, मी आरोग्य अधिकारी बोलतेय. आम्ही महिलांचा मेळावा घेतलाय. तुम्ही आलात तर आमच्या आदिवासी भागातील महिलांचं थोडं प्रबोधन होईल. मुली वाचवण्याविषयीही त्यांना सांगता येईल.
मी : हो, मी यायला तयार आहे; परंतु “मुलगी वाचवा मुलगी शिकवा' हा प्रश्नच मुळात आदिवासी समाजात नाही. ते कधीच मुलगा-मुलगी तपासयला जात नाहीत. त्यामुळं माझ्या भाषणाचा तसा फार उपयोग होईल असं वाटत नाही.
आवाज : हे खरं असलं तरी जनजागृती तरी होईल ना. म्हणून तुम्ही यावं ही विनंती.
मी: ठिक आहे केव्हा आहे कार्यक्रम ते कळवा. मेल करा, मी येईन.
आवाज : ठिक आहे, धन्यवाद ताई.

 फोन ठेवला; परंतु माझ्या डोक्यात काही प्रश्न येऊ लागले. का बोलावलं असेल इतक्या लांब ? मी शैलाला विचारलं.शैलाचही मत पडलं.की इतक्या लांब, त्या भागात कधी गेलो नाही आपण. धुळ्यापर्यंत आपण गेलो होतो. मी कैलासला विचारलं. “गाडी घेऊन जावं लागणार. जायचं का?" कैलासही जाऊया म्हटल्यावर मी त्यांना होकार कळवला. खरंतर, आम्ही चळवळवाले. कोणतीही परिस्थिती हाताळण्याचा अनुभव. दारुधंदेवाल्यां पासून ते डॉक्टर पकडण्यापर्यंत आमचा हात कुणीच धरत नसे. फक्त काळजी घ्यायची-

 त्या दिवशी संध्याकाळी निघालो. कैलासला गाडीत हवा, पाणी, डिझेल सगळी तयारी करून ठेवायला सांगितलं. कपडयांच्या बॅगा गाडीत टाकल्या आणि निघालो. बॅगा कायम भरुन ठेवलेल्याच असायच्या. त्यामुळं मी