पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लढाईची ही तयारी आहे की दुसरेच काही आहे?आपले सैनिक आपण लढायला पाठवत आहोत,कँप ठोकायला नव्हे.पण माँटगोमेरींचे पाय घट्ट जमिनीवर वावरणाऱ्या जनरलचे होते.रोज,तो त्याच्या जवानांबरोबर राहात होता,फिरत होता,बोलत-चालत होता.त्यांने चर्चिलना ताबडतोब जबाब दिला.तो म्हणाला,महोदय,आपले सैनिक लढायलाच जात आहेत,सारी तयारी त्यासाठी आहे.पण लढायांच्या इतक्या वर्षांच्या अनुभवावरून सांगतो,की दाढदुखीची ठुसठुस लागलेला सैनिक बंदुकीचा नेम धरून तिचा वापर करू शकत नाही किंवा रणगाड्यातल्या तोफेला बत्ती देऊ शकत नाही.त्याच्यासाठी दाढदुखीवर त्वरित उपचार करूनच त्याला लढायला पाठवावे लागते.चर्चिल समजून चुकले व माँटगोमेरींनी मागितलेल्या डेंटल खुळ मंजूर झाल्या.
 १५.०३ जनरल माँटगोमेरींना जे समजले तसे ते प्रत्येक कारखान्याच्या व्यवस्थापकाने समजून घेण्याची आवयकता असते.हे प्रत्यक्षाचे भान,जमिनीचे भान महत्त्वाचे आहे.भारतातल्या बऱ्याचशा नेत्यांचे ज्ञान पुस्तकी होते.बहुतेक सारे डॉक्टर,वकील,शिक्षक,प्राध्यापक पुस्तकी पेशातले होते.वस्तूंच्या उत्पादनाचा किंवा पानाची गादी चालवण्याचाही अनुभव त्यांच्यापाशी नव्हता.त्यामुळे शाब्दिक चिकित्सेचे कौशल्य व पुस्तकी किंवा शब्दांचे ज्ञान होते.त्या जोरावर त्यांनी पुस्तकी उत्तरे शोधली.घटपटाची चर्चा हा तर परंपरेतून चालत आलेला वारसा होता.जग जिंकावे,राज्य वाढवावे,व्यापार वाढवावा,ही प्रेरणाच हजार वर्षांच्या राजकीय गुलामगिरीमुळे नष्टप्राय झालेली होती.त्यामुळे त्यांनी कायदे बनवले ते मुळात उत्पादनप्रेरणेच्या विरोधी.कुठलाही उत्पादन करणारा हा जणू शत्रू,गुन्हेगार असे समजून सारी रचना आखण्यात आली.केक तयार करणे किंवा वाढवणे यात कुणालाच रस नव्हता.सारा जोर वाटणीवर व हिस्सा मागण्यावर,मग भाउबंदकीपेक्षा वेगळे काय निष्पन्न होणार?

 १५.०४ त्यामुळे संप,काम न करणे,बंद,घेराव,मंद काम ही नुसती राजमान्य नव्हे तर लोकप्रिय आणि भूषणाची साधने झाली.समाजापुढे पाच हजार माणसांना काम देणारा उद्योगपती हा आदर्श न ठरता पन्नास हजार लोकांना संपावर नेणारा आदर्श व हिरो ठरू लागला.हिंसक निदर्शने,बसेस जाळणे,माणसांना मारणे हे नित्याचे होऊन बसले.औद्योगिक व्यवस्थापनात.सारे महत्त्व 'लेबर प्रॉब्लेम'ला प्राप्त झाले.उत्पादनातील सुधारणा,कमीतकमी किंमतीत जास्त उत्पादन,जास्त चांगला दर्जा या गोष्टींना महत्त्व उरले नाही.या गोष्टी बाजूला पडल्या.औद्योगिक शांतता टिकवणे किंवा विकत घेणे हे

सुरवंटाचे फुलपाखरू ८९