पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कामगाराने कराराचे पालन केले नाही तर त्यांना दंड होऊ शकतो.सारांश,केकची निर्मिती ही प्रथम व तिचे वाटप नंतर असा व्यावहारिक मार्ग तिथे पाळला जातो.मागरिट थेंचर १९८० साली पंतप्रधान होईपर्यंत ब्रिटनमधले नेतेसुद्धा त्याच जोखडाखाली वावरत होते.ब्रिटनची प्रगती वरच्या दर्जाच्या औद्योगिक राष्ट्रापासून खालच्या दर्जाच्या पायरीवर घसरेपर्यंत वर्गकलहाचा मंत्र हा कामगार मालक संबंधातला मूलमंत्र होता.तेच पायाभूत तत्त्वज्ञान होते.
 १४.१८ ब्रिटिश संकल्पनेची आणि रशियन साच्याची ही चौकट आमच्या नवस्वातंत्र्याच्या सुरुवातीलाच आमच्या शहाण्यासुर्त्या देशभक्त पुढाऱ्यांनी इंग्लिशमध्ये विचार करून,आमच्या सामाजिक वास्तवाचा विचार न करता आमच्यावर लादली.मी पश्चिम व पूर्व जर्मनीत १९९६ साली गेलो होतो. त्यावेळी पूर्व जर्मनी रशियन जोखडातून नुकताच मोकळा (१९९२) झाला होता.त्यामुळे जुन्या लादलेल्या राजवटीच्या खुणा उपलब्ध होत्या.माझ्यासारख्या सामान्य प्रवाशाला रेल्वेतून प्रवास करताना दोन पद्धतीतला फरक स्पष्टपणे खिडकीतून दिसत होता.एकाच वंशाचे,हवामानाचे,धर्माचे दुभंगलेले राष्ट्र डोळ्यांसमोर सांधत होते.प्रयोगशाळेसारख्या स्थितीत समाजवादी पद्धतीच्या व खुल्या बाजारपेठेच्या आर्थिक विचारांचा फरक दिसत होता.आमच्या सर्व पुढाऱ्यांना खुली बाजारपेठ व समाजवाद यांचे एकाच देशातले दोन्ही प्रयोग पाहायला १९५० सालापासून उपलब्ध होते,पण त्यांनी ते पाहायचे नाकारले.माझ्याच एका आयुष्यात रेशनिंगपासून आजपर्यंत गेल्या पंधरा वर्षां भारतात झालेले बदल मी पाहतो आहे.फुकट गेलेल्या वर्षांची जाण मनाला जास्त झोंबते.

 १४.१९ ब्रिटिश विचारपद्धतीच्या जोखडाला पहिला धक्का महात्मा गांधी या, लंडनमध्ये कायद्याची पदवी संपादन केलेल्या एका द्रष्टयाने दिला होता.त्यांच्या स्वातंत्र्यचळवळीत ती सर्वसामान्य लोकांपर्यंत नेण्याचा जसा विचार होता तसा कोर्टापेक्षा समझौत्याला,तडजोडीला महत्त्व देण्याचा आग्रह होता.अहमदाबादमधली मजूर महाजन ही कामगार संघटना त्यामुळेच कामगारांच्या संघटित शक्तीच्या जोरावर द्विपक्षीय करार करत आली.महात्माजींच्या चळवळीत सरकारी कोटींवर बहिष्कार हा मोठा मुद्दा होता,पण त्याचा विचार स्वातंत्र्यलढ्यातले एक साधन एवढाच झाला.कोर्ट शाबूत राहिली व स्वातंत्र्योत्तर काळात तर प्रचंड प्रमाणात फोफावली. कोटींवर उपजीविकेसाठी अवलंबून राहणाऱ्या न्यायाधिशांची,वकिलांची,कारकुनांची,शिपायांची मोठी फौजच गेल्या पन्नास वर्षांत भारतात वाढली आहे.कोर्ट अक्षरशः तुडुंब भरून राहिली

८६ सुरवंटाचे फुलपाखरू