पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आदर्श त्यांच्याही सुप्त संस्कारात होताच.सर्वसामान्य कामगारांत तो जागवणे,फुलवणे हे कठीण होते.व्यवस्थापक म्हणून,कर्ता म्हणून,वडील भाऊ या पदामुळे माझे ते कर्तव्य होते,ते मी केले.माझ्या वागणुकीतला वेगळेपणा हा या कर्तेपणाच्या भूमिकेत आहे.तसे पाहायला गेलो तर मी स्वतः कामगार नव्हतो,त्यांचा पुढारी नव्हतो,नेता नव्हतो,लोकनियुक्त प्रतिनिधी नव्हतो किंवा सरकारी अधिकारी वा कोर्ट नव्हतो.मी व्यवस्थापक होतो.एका छोट्या कंपनीतला एक छोटा व्यवस्थापक होतो.
 १३.२० कर्त्याची भूमिका व्यक्तिवादी पाश्चात्य समाजातल्या व्यवस्थापन शास्त्रात बसत नाही.तिला पॅटर्नालिस्टिक विचार म्हणून हिणवण्याची पद्धत आहे.एवढेच काय,पण भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या अॅडवर्सरी कल्चरवाल्या कामगार कायद्यांत व्यवस्थापकाने युनियनच्या कामात लुडबूड करणे हे गर्दा मानलेले आहे.कारण त्या कायद्यात कामगार व व्यवस्थापन हे दोन भिन्न वर्ग आहेत व त्यांच्यात सतत वैर असणार हे गृहीत धरलेले आहे.त्यामुळे त्यात समन्वयाचे (कन्सीलिएशन) सर्व विचार ठिगळासारखे चिकटवलेले आहेत.मूळ विचार वर्गयुद्धाचा आहे.त्यांच्यात वर्गकलह अपरिहार्य आहे,तो संघर्षातून संपणार,कारण ते वेगवेगळे वर्ग सदस्य आहेत.त्यांचे संबंध केवळ करारमदारांनी चालणार अशी गृहीतकृत्ये त्यामागे आहेत.
 १३.२१ भी वर्गकलह ही कल्पनाच अ-भारतीय व भारतीय वास्तवाशी सुसंगत नाही असे मानतो.देहभेद हे जेवढे वास्तव आहे तेवढेच आत्म्याची एकात्मता हेही वास्तव आहे.सारे कामगार एका वर्गात मोडतात व सारे मालक एका वर्गात मोडतात,हे गृहीतक सत्याच्या म्हणजे प्रत्यक्ष-प्रामाण्याच्या कसोटीवर टिकणारे नाही.कामगारांचे अंतर्गत मतभेद,हेवेदावे,भांडणे,मानापमान,मारामाऱ्या ह्या साऱ्या गोष्टी मालक लोकांतही तितक्याच प्रमाणात असतात.युनियनची गेटमीटिंग घडवणे,लोकांना घरी जाण्यापूर्वी गेटवर थांबवणे, एवढेच काय कंपनीशी करार झाल्यावर मग गेटमीटिंगसाठी त्यांना थोपवणे हे किती कठीण असते ह्याचा अनुभव सर्व कामगारपुढाऱ्यांना येत असतो.मालक लोकांच्या संघटनातील मतभेद त्याच स्वरूपाचे व तितकेच तीव्र असतात याचा मला अनुभव आहे.माणसे वैयक्तिक दृष्टीने व स्वतःच्या फायद्यापुरता विचार करतात,त्यांना वर्गाच्या गाठोड्यात बांधून विचार करणे हेच मुळात चुकीचे आहे.

 १३.२२ हे साधे सरळ वास्तव नाकारून पढिक पंडितांनी पाश्चात्य चण्यातून विचार करून मालक-मजूर संबंघांचा विचका करून ठेवला आहे.

सुरवंटाचे फुलपाखरू ७७