पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अध्याय सोळावा


कँटिनची सोय व व्यवस्थापन


 १६.०१ कोकणात माझ्या लहानपणी शेतातल्या हंगामी कामासाठी पयरे म्हणजे तात्पुरते मजूर बोलावण्याची पद्धत होती.त्यांचे दोन प्रकार होते.एक म्हणजे सर्व मजूरी रोख पैशांच्या रूपात घेणारे आणि दुसरा सपोटी दुपारचे जेवण घेऊन थोडी मजुरी घेणारा.मजुरीचा दर वेगवेगळा असायचा.माझे मामा १९५७ च्या सुमारास निवृत्त झाल्यावर माझ्या आजोळी शेजारच्या गांवी राहायला गेले.त्यापूर्वी माझी आई त्यांच्या जमीनजुमल्याची व्यवस्था पाहत असे.माझे मोठे मामा होते तोपर्यंत त्यांच्याकडे बोलावलेले पयरे जेवूनखाऊन पद्धतीचे असत.त्यांचे दुपारचे जेवण माझी आई शिजवत असे.माझे धाकटे मामा आल्यावर त्यांनी रोख पैसे देण्याची पद्धत पसंत केली.माझ्या आईकडून त्या पयांना रोख पैसे कमी मिळायचे,पण एक वेळचे जेवण पोटभर मिळत असे.ती रोजच्या रोज पैसे देत असे असेही नाही.पण तिला गरज लागेल तेव्हा आणि तितके पयरे मिळायचे.माझ्या मामाना मात्र सर्व पैसे रोजच्या रोज रोख देऊनही पयरे मिळत नसत.मी घरी जायचा तेव्हा या विषयावर चर्चा व्हायची,पण ही माहिती माझ्या मनांत माहितीच राहिली होती.ती माझ्या ज्ञानाचा भाग झाली नव्हती.

 १६.०२ 'युनिकेम'मध्ये युनियन जेव्हा जेव्हा कँटिनचा प्रश्न उपस्थित करायची तेव्हा माझी भूमिका सरळ व पुस्तकी असायची.कारण कँटिन ही कायम डोकेदुखीची गोष्ट होती व असते.माझे म्हणणे असे होते,की कँटिनमध्ये

९६ सुरवंटाचे फुलपाखरू