पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केला; एक नवीन पायंडा पाडला आणि त्याचा उपयोग पुढेही चालू राहिला.मला स्वतःला या नव्या कल्पनेचे कौतुक वाटले.मी या कल्पनेचे नवेपण आणि परिणामकारकता याबद्दल 'युनिकेम परिवार' या कंपनीच्या मासिक पत्रिकेत स्वागतपर लिहिले.मुंबईतल्या कामगारांसमोर सणासमारंभात बोलण्याची वेळ येई तेव्हा त्या गोष्टीचे अनेक वेळा कौतुक केले.मला असे वाटले की सामान्यतः मालक मंडळी किंवा संचालक की जे इतरत्र मालक किंवा उच्च व्यावसायिक होते,त्यांनाही या नव्या प्रकाराचे कौतुक वाटेल.ते संप या प्रकाराबद्दल नेहेमीच निषेध व्यक्त करत असायचे.उत्पादनातल्या खंडाबद्दल किंवा अडथळ्यांबद्दल पोटतिडिकेने बोलायचे,कामगारांना व त्यांच्या पुढाऱ्यांना दोषी ठरवायचे.वसंतराव खानोलकरांनी नवी वाट पाडली,नुकसान न करता दबाव वाढवण्याची अहिंसक पद्धत वापरली,एखाद्या बारदेशकरांनी ती वाट जास्त रुंद केली तर या मंडळींना त्या प्रयत्नाचे कौतुक वाटायला हवे.म्हणून त्यानंतरच्या संचालकांच्या वार्षिक अहवालात या नव्या गोष्टीबद्दल,या नव्या उपक्रमाची नोंद करून कौतुकाचा मजकूर लिहून,तसा मसुदा त्यांच्यासमोर प्रतिवर्षाप्रमाणे ठेवला.मला वाटले होते,की प्रतिवर्षी जसा माझा मसुदा मान्य होत असे तसाच तो त्या वर्षीही होईल.पण तसे घडले नाही.संचालकांचा वार्षिक अहवाल हा कंपनीच्या दृष्टीने महत्त्वाचा दस्तावेज असतो.तो कंपनीच्या सर्व भागधारकांकडे जातो.त्यातली विधाने व हिशेब ह्यांना बँका,सरकारी खाती,शेअरबाजार म्हणजेच कंपनीचे मालक,सावकार या साऱ्यांकडे अधिकृत म्हणून मान्यता असते.त्याला ऐतिहासिक मूल्य असते.मी या नव्या,विघटनकारी नसलेल्या,उत्पादनांत खीळ न घालणाऱ्या पण संपाइतक्याच प्रभावाचा हा मार्ग मी नोंदला होता.
 १५.१५ आमच्या त्यावेळच्या संचालक मंडळाने माझा हा उल्लेख गाळला.त्याच्यावर फारशी चर्चाही केली नाही.त्यांची भूमिका माझ्या सहकाऱ्यांसारखीच असावी.बाकीचा मसुदा मान्य झाला पण मला जाणवलेला हा मुद्दा त्यांना पसंत पडला नाही.त्यांची सूचना मानणे मला क्रमप्राप्तच होते.कारण हा अहवाल त्यांचा होता.मी फक्त मसुदा बनवणारा होतो.मला वाटलेले त्याचे मूल्य व पृथगात्मता त्यांना जाणवली नाही,एवढे मात्र खरे.

 १५.१६ तेव्हा मला एका वेगळ्याच सत्याचे दर्शन झाले. कंपनीचे संचालक,अधिकारी ही सारी उच्चविद्याविभूषित,सजन,गुणी व उत्पादनाचे महत्त्व जाणणारी माणसे होती.पण म्हणून अशा नव्या वाटेचे महत्त्व त्यांना जाणवते किंवा कळतेच असे नाही.त्यांना जशास तसे,संप,मोडतोड ही

९४ सुरवंटाचे फुलपाखरू