Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



७२

सीताचरित्र.

फिरत आहेत. आज त्यांच्या भोजनाकरितां वन्य फळेंमुळेंच आहेत. आज ते राजकुमार एकटे निर्जन वनांत जात आहेत. जग- दीश्वराची माया व शक्ति मोठी विचित्र आहे. त्याच्यासमोर मोठ- मोठ्या राजराजेश्वरापर्यंतच्या लोकांनाहि आपले प्रतापी मुकुट नमवावे लागतात.
 याप्रमाणें तीं तिघें चालत असतां, संध्याकाळ झाली. आतां तेथें त्या तिघांशिवाय चौथें कोणीच नव्हतें. असहाय्य घोर वनांत जाण्याचा त्या तित्रांवर हा पहिलाच प्रसंग आहे. दिवस मावळ- ल्यावर त्या निर्जन वनांत कुठेतरी ते त्रिवर्ग थांबले. सायंकाळची नित्य कर्मे आटोपून रामचंद्र लक्ष्मणास म्हणाले 'बंधो, आतां तूं निर्जन वनांत आहेस. आतां येथें नगराचे स्मरण नको. आता तू आणि मी मिळून एक पर्णकुटी बांधूं. तृणशय्या रचूं. सर्व कांहीं आतां हातानेच करावे लागेल. एवढ्याकरिता फार धैर्यानें वागले पाहिजे.
 त्यांनी ती रात्र त्या निर्जन वनांत व्यतीत केली. प्रातः काळ · झाला, तशीं नित्यकृत्यें आटोपून पुनः ते दक्षिण दिशेला वाट चालू लागले. त्या वेळेस पतीबरोबर सृष्टिसौंदर्याचें व स्थलांचे दर्शन हो- तांच सीतेला किती तरी आनंद वाटला. वन्य आश्रम पाहण्याची सीतेला पहिल्यापासून आवड होती, हे आम्ही प्रथमच सांगि- तले आहे. याच कारणामुळे दुर्गम कंटकाकीर्ण विषम मार्गाला व भयानक वनालाहि ती फुलाप्रमाणे समजत होती.
 याप्रमाणें त्रिवर्ग मार्ग चालत चालत संध्याकाळच्या सुमा- रास प्रयाग तीर्थाजवळ येऊन पोहचले. जवळच भारद्वाज ऋषीचा आश्रम होता. आश्रमांत जातांच त्यांनीं भारद्वाज ऋषीला प्रणाम केला. भारद्वाज ऋषीची ओळख होतांच त्यांनी त्यांचा चांगला सत्कार केला. त्या मुनीनें त्यांस उत्तमोत्तम फळे खाण्यास देऊन