जनांना माझा प्रणाम सांग. परदेशी गेलेल्या भरत शत्रुघ्नाला प्रेमानें मी विचारिलें म्हणून सांग. समस्त प्रजाजनांना आमचें आंतरिक प्रेम प्रकाशित कर.
त्यानंतर दोघांधूनी मुनिवेष धारण करून सुमंत व गुह यांचा निरोप घेतला. मग सीतेला घेऊन ते नावेत बसले. थोड्याच वेळांत नांव दक्षिण दिशेच्या किनाऱ्याला लागली. तिघेहि सानंद गंगा- पार उतरले.
आतां रामचंद्रानी दुर्गम वनांत प्रवेश केला. गहन वनांत शिर- तांत्र भावी आपत्तीची चिंता वाहून रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले, • बंधो, पहा वरें येथून आतां फार अवघड वाटेने चालावे लागेल. या वनांत कोणी मनुष्य देखील दिसत नाहीं. येथे एखादें शेत • अथवा वाटिका नाही. येथील रस्ता विकट आहे. कुठें उंच तर कुठे खोल खळगे. येथें जानकीचे रक्षण फार जपून केलें पाहिजे. तूं पुढे पुढे चल. नंतर जानकी, तुम्हां दोघांना संभाळीत मी तुमच्या मागून चालतो. पुढे तूं व मार्गे मी. वनांत कसें दुःख आहे, आज जानकीला कळून येईल. '
( वा. रा. कां २ सर्ग १२ )-
आपल्या स्वामीच्या मुखानें असें भीतिदायक भाषण ऐकून सीता देवीच्या मनांत वनवासाच्या दुःखाचें चित्र खचीत उभे राहिलें असेल ! परंतु ती भ्यायलीहि नाहीं, व अधीरहिं झाली नाहीं. या कारण हैं होतें कीं तिच्या मनांत स्वामीविषयीं अकृत्रिम व 'आंतरिक प्रेम होतें. त्या प्रेमामुळे व पती सेवाधर्मापुढे अत्यंत कठीण दुःखहि ती कांहींच समजत नसे; व दुसरें रामचंद्राच्या पराक्रमा- विषयी तिला पूर्ण खात्री होती. यांच्याबरोबर राहण्यांत आपत्ती कांहीं कारण नाहीं, असें तिला पूर्णपणे वाटत होतें. यामुळे तिला वनवासाचे दुःख वाटत नव्हतें व तिसरे कारण तिला बालपणा- पासून सृष्टिसौंदर्य पाहण्याची आवड होती; त्या योगाने तिला