Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुसरें कांड

६७

पिता, विलाप करणारी माता, दुःखार्त स्वजन, व प्रेमविव्हल अयो- व्यानिवासी लोक यांचें स्मरण करून ते आपले हृदय शोकानलाने दूग्ध करूं लागले. त्या वेळेस दोघा बंधूंचे व सीतेचें हृदय दुःखाने व्याकुल झालें. कसें तरी करून त्या प्रज्वलित झालेल्या शोकाशीला कांहींसा शांत करून त्यांनी संध्यावंदन केलें. नित्यकर्म आटोपल्या वर रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले, 'वा लक्ष्मणा, वनवासाची आजची आपली ही पहिलीच रात्र आहे. याप्रमाणे आपणाला वनवासांत. चौदा वर्षे काढिली पाहिजेत. आजची ही पहिलीच रात्र तमसेच्या तीरावरच घालविण्याचा मी बेत केला आहे. जरी या ठिकाणी फळ मूळांची कमतरता नाहीं, तरी मी आज उपवास करावा, असें इच्छितों. मी पाणीमात्र पिईन. '
 यानंतर लक्ष्मणाने रामचंद्राकरितां सुंदर पर्णशय्या तयार केली. रामचंद्र व सीता त्या पर्णशय्येवर निजले, परंतु सुमंत व लक्ष्मण उभयतां रामचंद्राचे गुण वर्णन करीत जागत बसले. ते जरा देखील निजले नाहींत. लक्ष्मणासारख्या भ्रातृसेवी महात्म्याला बंधूची सेवा व त्याचे गुण वर्णन करतांना केव्हातरी झोप येईल का ? केव्हां हि येणार नाही.
 थोडी रात्र असतांच रामचंद्र जागे झाले, तों अद्यापि अयो- ध्यावासी लोक झोपेतच आहेत असें त्यांच्या दृष्टीस पडलें. ते जागे - होण्याच्या पूर्वीच तेथून निघावे असे रामचंद्रांनी ठरवून त्याप्रमाणें ते रथांत बसून निघाले. त्यांनी रथ इतक्या वेगानें हांकला कीं, ते थोड्याच वेळात फार दूर निघून गेले. तेथें कोसल देशाच्या सीमेला लागून एक नदी होती. तिचें नांव वेदश्रुति. ती उतरून ते सरळ दक्षिण दिशेला गेले. याप्रमाणें चालता चालतां गोमती व स्यदिकाया नद्या पार होऊन ते समृद्धशाली श्रृंगवेरपुराजवळ जाऊन पोहचले. या शृंगवेरपुराजवळ त्रिपथगामिनी कलनादिनी भागीरथी वहात