Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६२
सीताचरित्र.

तुझे कष्ट पाहू शकत नाहीं. तुला दुःख देऊन मी स्वर्गाचीहि इच्छा करीत नाहीं. भीतीची गोष्ट तर काय ! मी सर्व गोष्टींबद्दल निर्भय आहे. मला खात्री आहे कीं, मी तुझें सर्व प्रकारें संरक्षण करूं शकेन. मी तुझी आंतरिक इच्छा जाणण्याकरितांच आतांपर्यंत तुला बरोबर घेऊन जाण्याचें केले नाहीं. तूं माझ्याबरोबर वनांत येण्यास तयार झाली आहेस, याबद्दल आतां माझी पूर्ण • खात्री झाली आहे, मी तुला मोठ्या आनंदाने सांगतों कीं, तूंही आतां धर्मपालनाचा दृढ संकल्प कर. हे प्रिये, तूं जी हकीकत सांगितली आहेस, व तूं जें कांहीं करूं इच्छित आहेस, ती गोष्ट फारच उत्तम आहे. तेंच तुझें कर्तव्य आहे, व तोच तुझा धर्म आहे. दोन्हींहि कुलांची प्रतिष्ठा यांतच आहे. बरें तर, आतां वनांत निवण्याची तयारी कर. तूं हि आतां आपलीं वस्त्रे, भूषणे, घन, रत्न, अन्न वगैरे सर्व पदार्थ ब्राह्मणांना दान कर. हैं सर्व त्वरित कर; कारण आजच वनांत जाण्याची तयारी आहे. '

( वा. रा. कां. २ सर्ग. ३० ).

 जेव्हां रामचंद्रानें सीतेस आपल्याबरोबर वनांत नेण्याचें कबूल केलें, तेव्हां सीतेस फार आनंद झाला. शेवटीं प्रेमाचाच विजय झाला. सीतेच्या विशुद्ध प्रेमामुळे रामाला हार खावी लागली. सीतेनें आपल्या स्वामींच्या आज्ञेप्रमाणे लागलेच आपले सर्व पदार्थ ब्राह्म- णांस दान करून टाकले. ज्या वेळेस सीतेचें व रामचंद्राचें हें वरील भाषण झालें, त्या वेळेस लक्ष्मणहि त्यांच्याबरोबरच होता. सीता वनांत खास येणार अशी जेव्हां त्याची त्यावेळेस खात्री झाली, तेव्हां तो • हात जोडून नम्रपणाने रामाला म्हणाला, 'महाराज, जर वनांत जाण्याचा आपण दृढ संकल्प केला आहे, तर मलाहि आपण चिरसंगीसेवक म्हणून बरोबर घेऊन चला. ' लक्ष्मणाचें हें विनम्र भाषण ऐकून रामचंद्रांनी त्याची पुष्कळ समजूत केली. त्याचे आपल्या बंधूवर
.