Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुसरें कांड

६१

बरोबर आहे. जेव्हां मी आपल्याबरोबर वनांत येईन, तेव्हां वनांतील दुर्गम मार्ग देखील : माझ्याकरितां सुखदायक होऊन जातील. त्यामुळे मला मार्ग चालावयाचे कष्ट वाटणार नाहीत. अरण्यांत रस्त्यांत पडलेले कुशकंटक मला रुई: प्रमाणे वाटतील. प्रबल वायुवेगानें जेन्हां धूळ माझ्या अंगावर उडेल, तेव्हां मी तिला केशर, व चंदनाप्रमाणे मानीन. वनांतील पर्णश- य्याहि माझ्याकरितां कोमल, मऊ, रेशमी बिछान्यापेक्षाहि अधिक सुखदायक होईल. हे नाथ, मला आपल्याबरोबर वनांत कोणतेहि कष्ट वाटणार नाहीत. ( वा. रा. का. २ सर्ग. ३० ).
 स्त्रियांचा स्वभावच असा असतो की, पतीच्या घरी राहून जेव्हां त्यांना फार दिवस होतात, तेव्हां त्या माहेरी जाण्यास कधी कधी हट्ट करतात. हीच शंका रामचंद्राच्या मनांत आली. ते मनांत विचार करूं लागले कीं, जर मीं हिला वनांत नेली, तर ही तेथें माहेरी जाण्याची आठवण काढून घोटाळा होईल. ते आपल्या या विचारांत आहेत, इतक्यांत सीता म्हणाली नाथ, मी वनांत आपल्याबरोबर आल्यावर आपल्या आईबापांची आठवण काढणार नाहीं. आपल्याला ज्यापासून कष्ट होतील असें काम, अथवा भाषण देखील मी तेथे करणार नाहीं. जथे आपण आहांत, तेथे माझ्या- करिता स्वर्गच आहे. व आपला वियोग हाच महानरक आहे. आपल्या.. वांचून मी जावंत राहणार नाहीं हें आपण अगदी निश्चित समजा. चौदा वर्षेच काय, पण चौदा क्षण मात्रही मला आपला वियोग सहन होणार नाहीं. ' असें बोलून स्नेहाने व्याकूळ होऊन सीता- देवी रामचंद्राच्या समोर स्फुंदून स्फुंदून रडूं लागली. दयानिधिः रामचंद्राला सीतेची ती... कारुणिक दशा फार वेळ : पहावली - नाही. तिचे दुःख पाहून त्यांचेहि हृदय भरून आले. त्यांच्याहि नेत्रांतून अश्रुधारा वाहू लागल्या. ते सीतेस म्हणाले, देवी, सी हे
4