आपल्या बलाची व तेजाचीं पुष्कळच तारीफ करीत होते. त्या सर्व M • गोष्टी आज स्वप्नवत् झाल्या म्हणायच्या. मी आपणास सत्यवान् समजतें; व आपण मला सावित्री समजनां. मी आपला सहवास • कधीहि सोडणार नाहीं. मी पतिव्रता आहे, व मला माझ्या माता- पितरांनी पातिव्रत्य धर्माची शिक्षा दिली आहे. तें शिक्षण माझ्या मनांत पूर्णपणे ठसले आहे. मी आपल्या त्या धर्माचे पालन करण्या- करितां आपल्याबरोबर येईन. आपणाला माझा त्याग करणें उचित नाहीं. वनांत जी दु:खें आहेत म्हणून आपण सांगितलींत, व जीं सांगण्याची बाकी राहिली असतील, ती सर्व मला मान्य आहेत. तेथें कंद, मूळे, फळे, वगैरे जें कांहीं मिळेल, तें सर्व मी अमृताप्र- माणे मानीन. या गोष्टीची तर आपण मुळींच चिंता करूं नये. आपण माझ्यासारख्या निरपराधिनी, पतिव्रता, व पतिप्राण स्त्रीला येथें सोडून कां जातां, हे मला कळत नाहीं. मी उगीच अशी. तशी स्त्री नाहीं. मी परपुरुषाच्या वाऱ्यासहि उभी राहणार नाहीं. एवढ्याकरितां मी पूर्ण निश्चयानें सांगतें कीं, मी आपणाबरोबर वनांत अवश्य येईन.
(वा. रा. कां. २ सर्ग. ३०).
वाचकहो, जेव्हां रामांनीं ' मी वनांतून परत येईपर्यंत तूं भरता- जवळ रहा' असें सीतेस सांगितलें, तेव्हां ही गोष्ट सीतेच्या हृद- यास शस्त्राप्रमाणे टोचली. तिला अत्यंत दुःख झाले. ती दु:खांत:- करणानें म्हणाली- 'नाथ, आपण हें काय म्हणालांत ? वाटेल तर आपण भरताच्या आधीन रहा, पण या गोष्टींत आपण माझ्यावर सक्ती करू शकत नाहीं. मी भरताच्याच काय, पण आणखी कोणा च्याहि स्वाधीन राहू शकत नाहीं. मी आपल्याला वारंवार सांगत आहे की, 'मी आपल्याबराबर येणारच ? याबद्दल आपण खात्री ठेवा. मला तर आतां आपल्याबरोबरच रहावयाचे आहे. तें मग वन असो, अथवा स्वर्ग असो. आपण कोठेंहि असा, मी आपल्या-
·