५७
कृतार्थ समजेन. मग तर झालेंना ! याप्रमाणे मी आपल्याबरोबर आपला काळ मोठ्या आनंदाने व सुखाने घालवीन.'
( वा. रा. का. २ सर्ग. २७)
सीतादेवीला प्राकृतिक सौंदर्य पाहण्याची लहानपणापासूनच फार उत्सुकता होती हैं आह्मी पहिल्या कांडांत सांगितलें आहे. तिने आपल्या पित्याच्या गृहीं तापसांच्या तोंडून आश्रमासंबंधाच्या पुष्कळ गोष्टी ऐकल्या होत्या, त्यामुळे वन्य आश्रम पाहण्याची इच्छा तिच्या मनांत अत्यंत प्रवल झाली होती. एवढ्याच करितां आपल्या बालपणांतील वन्य आश्रमांत तपस्विनीप्रमाणे राहण्याची ती इच्छा यावेळी आपल्या पतीबरोबर जाऊन ती पूर्ण करणार होती. आतां उत्तम संधि आली आहे, असेंच तिला वाटले. वनांत फार दु:ख होईल, वनवास हा फार दुःखदायी आहे, हें सीतेला माहीत नव्हते. तपस्वीजनांचे आश्रम फार चांगले असतात, त्यांच्या आस- पास सुंदर सुंदर उपवनें अलतात, तेथें नानाप्रकारच्या पक्ष्यांच सुस्वर गाणी ऐकू येतात, तेथील वनश्री मोठी मनोहर असते, असेंच तिने यावेळपर्यंत ऐकिलें होतें. वनांत असे असे भयंकर प्राणी आहेत कीं,. ज्यांच्या आरोळ्या ऐकून मोठमोठ्या धैर्यवान् पुरुषांच्याहि हृदयांत धडकी भरते हैं तिला माहीतही नव्हतें. या सर्व गोष्टींचा विचार करूनच रामचंद्र सतिला बरोबर नेण्यास कांकूं करू लागले.
रामचंद्रांनी वनांतील क्लेशांचे वर्णन करण्याच्या इच्छेनें सतिला - बराच उपदेश केला. ते म्हणाले-' प्राणप्रिये, वनांत एक प्रकारचे नव्हे, तर अनेक प्रकारचे क्लेश सहन करावे लागतील. तेथें पर्व- - तांतील गुहांत राहणारे सिंह रात्रंदिवस ओरडत असतात. अनेक भयंकर जीवजंतु अहोरात्र खुल्या मैदानांत हिंडत असतात. ते आपल्याला एकटे पाहून खाऊन टाकतील. मस्त, खुनी अशा जंगली हत्तींपासून आपले संरक्षण करण्याचे काम सोपे नाहीं. तेथील मार्ग