५५
क्याच्याहि सुखाची इच्छा करीत नाहीं. मी फक्त आपल्या सहवासा- चीच इच्छा करते. आपल्याबरोबर राहण्यांतच मला खरें सुख मिळणार. आपल्याला सोडून वेगळे राहून स्वर्गातील सुखाचीहि म इच्छा करीत नाहीं. वनांत मी फळेंमूळे खाऊन राहीन; व आप- ल्याला दु:ख देणार नाहीं. घोर वनांत राहून आपल्या चरणाची सेवा करितांना मला पित्याच्या घरीच असल्याप्रमाणे वाटेल. मला बरोबर घेऊन चलण्यांत आपणाला मुळींच त्रास होणार नाहीं. मी आपल्याशिवाय एक क्षणभर देखील जिवंत राहाणार नाहीं. मी आपल्या पुढेपुढे कंटक दूर करीत चालेन. ज्याप्रमाणें निर्जल अथवा मरुभूमीतील प्रवासी आपल्या कमंडलूंतील उरलेलें पिण्याचें पाणी फेंकून देत नाहीं, तर ते आपल्याजवळ बाळगितो, त्याचप्रमाणे आपण मला आपल्याबरोबरच घेऊन चला. येथें मागें ठेवू नका. आपण मला बरोबर घेऊन जाऊं नये, असा माझ्यामध्ये कांहीं एक दोष नाहीं. आपण वीरपुरुष आहांत. जर आपण मला वनांत बरोबर घेऊन जाणार नाहीं, तर लोक आपणाला काय म्हणतील? कांहीं लोक आपणाला शौर्यात कमी समजण्याचा मात्र संभव आहे.
( वा. रा. कांड २ सर्ग २७. )
वाचकहो, सीतादेवी आपल्या कर्तव्याला कशी उत्तम रीतीनें जाणत होती, हें आतां आपणच पहा. तिने अशा रीतीनें आपल्या स्वामीचें वनांत जाण्याचे वृत्त ऐकून मलाही आपणाबरोबर चलाव. याचें आहे, असें रामाला सांगितले. जिथे पति तिथे त्याची पत्नी सहचारिणी असणार. सीतेचें हैं किती साधें व स्वाभाविक भाषण: आहे ! सीतादेवी म्हणाली कीं, मी आपल्यापुढे खडे व कंटक दूर करीत चालेन. यांत पतिप्रेम किती उत्तम तऱ्हेने झळकत आहे, तें पहा. हेतु हा कीं, मार्गात जर कांटे वगैरे असतील, तर ते प्रथम माझ्या पायास लागून नाहींसे होतील, आपल्या पायाला लागणार