Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



दुसरें कांड

४९

पित्याच्या धर्माचें रक्षण करूं शकत नाहीं, तर आपल्या जगण्याचें. फल काय ? भरत फारच सुशील व नम्र आहे. त्यानें आपला काय अपराध केला आहे ! देवी कैकयी आपली वंदनीय माता आहे. त्यांची निंदा करण्यांत आपल्या हातून फारच मोठा अपराध होत आहे. " हें रामाचें भाषण ऐकून लक्ष्मण खाली मान घालून उगीच उभा राहिला.
 रामानें वनांत जाण्याची दृढ प्रतिज्ञा केली आहे, व वनांत जाण्याचा त्याचा निश्चय कांहीं केल्या बदलणार नाहीं, असें जेव्हां कौस- येनें जाणिलें, तेव्हां ती रामाला म्हणाली- ' हे पुत्रा, जर तूं वनांत जाणार, व माझ्या सांगण्यानेंहि रहात नाहींस, तर मला तरी M बरोबर ने. परंतु पति असतांना स्त्रिने पतीला सोडून वेगळें राहू नये. स्त्रीकरितां पति हीच गति आहे, पतीची सेवा करणे हाच स्त्रीचा मुख्य धर्म आहे. मी वनांत गेल्यावर वडिलांना फार दुःख होईल. तूं जर येथें न रहाशील, तर वडिलांना धीर कोण देईल ! व त्यांची सेवा कोण करील, अशी रामानें कौसल्येची समजूत केली.
 'राम आपल्या निश्चयापासून यत्किंचितही ढळणार नाहीं, व वनांत अवश्य जाणार, असें जेव्हां कौसल्येनें पाहिलें, तेव्हां तिने डोळ्यांत आंसवें आणून रामचंद्राला आशीर्वाद दिला, व वनांत त्याला सुखी ठेवण्याविषयी ईश्वराची वारंवार प्रार्थना केली. याप्र- माणे मातेची समजूत करून व तिच्या चरणांला वंदन करून लक्ष्मणासह रामचंद्र सीतेच्या मंदिराकडे निघून गेले.
 जोपर्यंत आपला खरा प्रेमविषय मनुष्य भेटत नाहीं, तोपर्यंत कोणी मनुष्य अतिशय कष्ट व मनःपीडा सहन करतो. दुःखांत धीर देणाऱ्या मित्रापुढे आपले मनोविकार छपले जात नाहींत. अति- परिचित मित्रापुढे, खऱ्या प्रेम करणाऱ्या मनुष्याजवळ, व अभिन्न हृदयंजना पुढे आपले मन खुले करणे भागच पडते. अभिन्न हृदया समोर हजारों उपाय केले तरी आपण आपले मनोविकार लपवू शकत