Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
दुसरें कांड

४५.

भरतास राज्याभिषेक होईल. तूं आतां वनवासास जाण्यास उशीर करूं नकोस. जोपर्यंत तूं येथें राहशील, तोंपर्यंत राजा शोकावस्थेत राहील, व मी अन्नपाणीहि घेणार नाहीं. याकरितां वनवासास जा- ण्याची लवकर तयारी कर.
 वाचकहो, कैकयीच्या तोंडून असें दारुण भाषण ऐकून राम - चंद्राला वाईट वाटलें कीं काय ! याचा आपणच विचार करा ... त्याचें त्यांना मुळींच वाईट वाटलें नाहीं. रामचंद्र कांहीं साधारण मनुष्य नव्हते, तर त्यांस वनांत जाण्याचें ऐकून वाईट वाटेल. ते धैर्यवान् अर्थात विचारी होते. राज्याभिषेक होणार म्हणून ज्यांच्या तोंडावर आनंदाची छाया दिसली नाहीं, त्यांच्या चेहऱ्यावर वनवासास जावे लागणार म्हणून मग उदासीनता तरी कोठून दिसणार ! त्यांना राज्यप्राप्तीचा जसा हर्ष नव्हता, तसें वनवासाचें दुःखाहि वाटलें नाहीं. त्यांना दोन्ही अवस्था सारख्याच होत्या. कैकयीच्या मुखानें वनांत जाण्याचें ऐकून रामचंद्र म्हणाले-

'

अहंहिं सीतां राज्यंच प्राणानिष्टान्धनानिच ।
 हृष्टो भ्रात्रे स्वयं दद्याम्मरताय प्रचोदितः ॥
किं पुनर्मनुजेंद्रेण स्वयं पित्रा प्रचोदितः ।
तव च प्रिय कामार्थे प्रतिज्ञामनुपालयन् ॥

वा. रा. काण्ड. २ सर्ग १९,

 ' मी आपल्या व वडिलाच्या सांगण्याप्रमाणे भरताला राज्यच काय, पण सीता व माझे प्राणहि देण्यास तयार आहे; मग राज्याची ती कथा काय ! मी भरताला सर्वस्व देण्यास समर्थ आहे. आतां तर साक्षात् पित्याचीच आज्ञा आहे, व आपलेहि हेतु सफल होत आहेत. देवि, आपण महाराजांस संतुष्ट करा. मी आतां वनांत चाललो. सीतेची समजूत करण्यास व माता कौसल्येला एकदां नम- स्कार करून येण्यास जेवढा वेळ लागेल तेवढाच कायतो !