आढळले. या महोत्सवाचें कारण समजावें म्हणून तिनें आपल्या शेजारीच उभ्या असलेल्या दासीला विचारिलें, कीं,अग,या महोत्सवाचे कारण काय ? नगरांत हें काय चालले आहे.
मंथरेनें विचारिल्यावर दासीनें इत्थंभूत हकीकत व कारण तिला सांगितलें. रामचंद्राच्या युवराजपदारोहणाच्या बातमीनें तिच्या आशेची पूर्ण निराशा झाली. तिनें लगेच मनांत विचार केला कीं, काय, खराखरच कौसल्यानंदन रामचंद्र गादीवर बसणार ! आजच कैकयीचा सौभाग्यसूर्य अस्तास गेला काय ? भरताला नेहमीं कर तांच परतंत्रता भोगावी लागणार काय ! या दुष्ट विचारांनीं कुब- डीच्या कलुषित हृदयांत अगदीं खळबळ उडवून दिली. तिच्या डोक्यांत मोठ्या विचारांचे कंदन माजून गेलें. तिला आतां खात्रीने वाटलें कीं या मातापुत्राचें पुढील आयुष्य अंधकारमय झाले.. राज्य स्वाधीन केल्यावर मग त्यांस कोण पदच्युत करणार ! तर मग भरताच्या उद्धाराचा कांहींच मार्ग दिसत नाहीं काय!' असें. मनाशीं म्हणून तिनें थोडासा विचार केला ! असा कांहीं वेळ विचार केल्यावर तिची कुटिल दृष्टि विस्तृत झाली. तिच्या तोंडावर आनं-- दाची झाक दिसूं लागली. निराशेचे स्थान आशेने पटकाविलें. जरासा विचार केल्यावर मंथरा मंदिरांत निघून गेली.
कैकयीच्या महालांत गेल्यावर मंथरा तिला म्हणाली ' महाराज, आपण तर नेहमी आपल्या सुखांत दंग असता, आपल्या घरांत काय होत आहे, याचा आपणास मुळींच पत्ता नसतो. आपणास नेहमी असे वाटतें कीं आपणच काय ती राजाची आवडती राणी ! आणि ह्याचा आपणास अभिमानहि वाटतो ! पण तो सर्व पा विसरून जा. महाराज, तें आपलें मुखस्वप्न धुळीस मिळालें, धुळीस !. मंथरेनें असें म्हटल्यावर, याचा अंतस्थ हेतु काय असे कैकयीने तिला विचारिलें. तेव्हां तिनें तिला सर्व हकीकत सांगितली.
पान:सीताचरित्र.pdf/५८
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६
सीताचरित्र.