Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०
सीताचरित्र

कांचा त्यांस अधिपतिं केलें आहे त्याने जर त्यांचें इच्छित पुर्ण करून त्यांस संतुष्ट केलें नाहीं तर तो राजा कशाचा ! राजाचे अस्तित्व प्रजेकरितांच आहे. प्रजेच्या सुखाकरितां राजाला जीवापाड कष्ट केले पाहिजेत.
 त्या काली सत्याला मोठा मान असे. जे लोक राजसमेत बसून आपले मत देत असत, ते आपली स्वतंत्रता कधींहि गमावून बसत नसत. फाजील खुशामत करण्याची त्यांना मुळींच संवय नव्हती. ते आपले मत स्वतंत्रपणें व न भितां प्रदर्शित करीत; व राजेहि तें मोठ्या श्रद्धेनें ऐकून घेऊन मान्य करीत असत. ते राजाच्या भी- तीनें त्याच्या अन्यायी कार्याला मत देत नसत. राजा दशरथाने बोलाविलेले सर्व लोक असेच कार्यतत्पर, निर्भय मनाचे व न्याय- प्रिय होते.
 जेव्हा मंत्रीजन राजसमेत येऊन आपापल्या पदावर विराजमान झाले, तेव्हां राजा दशरथ त्या सर्वांना उद्देशून म्हणाला-' प्रिय- सज्जनहो ' मी आतां वृद्ध झालों. फार मेहनत करून मी हा राज्यशकट आजपावेतों चालविला. माझ्या वृद्धावस्थेमुळे प्रजापालन करण्यास मी आतां असमर्थ झालो आहे. या कारणांमुळे सर्व राज्य- कारभार माझा ज्येष्ठ पुत्र रामचंद्र याजवर सोपवून निश्चितपणानें ईश्वरभजनांत काळ घालवावा असे मी योजिले आहे. कारण हें शरीर नाशवंत आहे. कोण जाणे हें केव्हां नष्ट होऊन जाईल तें ! एवढ्याच करितां सर्व कारभार सोडून ब्रह्मज्ञानांत मग्न होऊन रहाणें हेंच मला उचित आहे. आपल्या शास्त्रांतहि हेंच सांगितलें आहे कीं, मुलगे मोठे झाल्यावर त्यांच्यावर सर्व गृहस्थाश्रमाचा भार सोपवून आपण वानप्रस्थाश्रम स्वीकारावा. पित्याचें हेंच मुख्य कर्तव्य आहे. तेव्हां याबद्दल आपली सर्वांची काय संमति आहे हे मला सांगा. माझा रामचंद्र याला योग्य आहे किंवा नाहीं ! अथवा