Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
सीताचरित्र.

बंधन कोणीहि शिथिल करूं शकणार नाहीं अशी रामचंद्राची व सीतादेवीचीहि पूर्ण खात्री झाली.
 रामचंद्रजी राजनीति जाणत्यांमध्येहि श्रेष्ठ होते. ते जसे नीतिमान् होते तसेच धर्मज्ञहि होते. धर्म आणि नीति यांमध्यें ते भेदाभेद करीत नव्हते. त्यांच्या दृष्टीने हीं दोन्हीं एकच होतीं. जो धर्म तीच नीति, व जी नीति तोच धर्म. परंतु एका गोष्टीच्या मात्र ते अगदी विरुद्ध होते. कुनीति ही ती गोष्ट होय. हिचा मात्र ते मनापासून तिरस्कार करीत असत. त्यांना नेहमी सत्य व न्याय्य मार्ग पसंत वाटे. विवाह झाल्यावर रामचंद्राकरितां एक निराळें मंदिर बांधण्यांत आले. राज्यकारभारांत रोज ते आपल्या पित्यास मदत करीत असत. नंतर आपल्या मातांची सेवा करून जो वेळ मिळे त्यांत आपल्या मंदिरांत येऊन विश्रांति घेत असत. तेथें आल्यावर ते सीतादेवीला प्रेम भरीत दृष्टीनें पाहून मनांत अत्यंत संतुष्ट होत असत. ति मनोरंजन करून तिला नानाप्रकारचा उपदेश करीत असत. त्याचप्रमाणे नानाप्रकारची धर्मचर्चा करून व पातिव्रत्य धर्मावर भाषणे करून तिला ते धर्माचें गुह्य समजावून देत असत. सीतादेवी रामचंद्राची अमृतवाणी ऐकून फार संतुष्ट होत असे, व त्यांची सर्व भाषणें अगदी लक्षपूर्वक ऐकत असे. केव्हां केव्हां ती आपल्या वाल्यकालांतील गोष्टीहि आपल्या पतीस सांगत असे. मार्गे आम्हीं सांगितलेच आहे कीं, सीतादेवी जेव्हां आपल्या पित्याच्या गृहीं ऋषीवरोवर संभाषण वगैरे करीत असे, तेव्हांपासून तिला तपोवन व ऋषींचे आश्रम पाहण्याची प्रबल इच्छा उत्पन्न झाली होती. पतीबरोबर संभाषण करतांना केव्हां केव्हां वनांत जाण्याची तिची ती इच्छा जागृत होई. आपल्या पती दरोवर पुष्पित वनांत विहार करण्याची तिला वारंवार इच्छा होई. दयामय रामचंद्र आपल्या प्रियेच्या इच्छेप्रमाणे तिला वनविहार करण्यास