१९
वस्तु आंदण दिल्या जाण्याच्या वेळीं जनकराजा थोडे दूर त्यांस पाचवण्यास गेला. त्या वेळेस त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वहात असून त्याचा कंठ सनदीत झाला. स्नेहानें हृदय भरून आलें. धैर्याशिवाय अशा वेळीं कशाचा अवलंब होणार ! शेवटी त्याचेंच त्याने अवलंबन केलें. शोकवेग आवरून राजर्षि जनक आपल्या महालांत परत आले. ज्याप्रमाणे अमावस्येच्या रात्री चंद्राच्या चांदणीशिवाय पृथ्वीवर अंधकार पसरलेला असतो, त्याप्रमाणें सी- तेच्या जाण्यानें राजा जनकाचें मंदरिच काय, परंतु सारी मिथिला नगरी शोभाहीन व आनंदरहित भासू लागली. परंतु राजा जनक हे महाज्ञानी होते. ते स्नेह व मोह यांना आंवरून पूर्ववत निर्लिप्त होऊन राज्यारभार पाहूं लागले.
इकडे राजा दशरथ आपल्या पुत्रांना व सुनांना बरोबर घेऊन आनंदानें अयोध्येस जाण्यास निघाले. थोडे दूर जातात तोच त्यांचा आनंद नष्ट झाला. कारण कीं, रामचंद्राच्या हातून धनुष्यभंग झाल्याचे ऐकून भीमकर्मा परशुराम अत्यंत रागावले होते. ते अकस्मात येऊन त्यांनी त्यांस मार्गात अडविलें. त्यांनी राम लक्ष्मण यांस पुष्कळ प्रश्न केले. त्या प्रश्नोत्तरांत रामचंद्रापुढे त्यांचें कांहीं चाललें नाहीं. ते शेवटी त्यांत हरले, आणि आपल्या ठिकाणीं निघून गेले. नंतर राजा दशरथ आनंदाने मार्गक्रमण करूं लागले. अयोध्येजवळ आ- ल्याचे आनंदायक वर्तमान जेव्हां सर्वास कळलें, तेव्हां अयोध्येतील स्त्रीपुरुष आनंदसागरांत बुडून गेले. राजमहालांत आनंदाला पारावार नव्हता. जेथें सीतादेवीसारख्या देवीचें पदार्पण होणार होते, तेथे कोणच्या प्रकारची कमरता असू शकणार आहे! राणीवसांतील स्त्रियांनी मुलाचें व सुनेचें चंद्राप्रमाणे मुख पाहतांच लिंबलोण केले. त्यांचा आनंद गगनात मावेना. सीतेचा जेव्हां गृहप्रवेश झाला, तेव्हां तेथें नानाप्रकारचे मंगलोत्सव सुरू झाले.