Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८
सीताचरित्र.

आपल्या स्वामीचें हर्षोत्फुल्ल मुख पाहून तिचंही चंद्रवदन प्रफुल्लित झाले. रामचंद्राचे दर्शन होतांच सीतेला असें वाटलें कीं : रामचंद्र नुकतेच यौवनावस्थेत पदार्पण करीत आहेत. रामचंद्राच्या शरीरांतून दिव्य सौंदर्यरस टपकत होता. त्यांचा सर्व देह सुदृढ, सुरूप, व सर्व शक्तीचा आधारस्तंभच वाटे. त्यांच्या सुंदर भुवया व मानसिक तेज-हीं सच्चरित्राचें प्रत्यक्ष प्रमाण दर्शवीत होती. त्यांच्या राजीवनयनांतून प्रतिभा प्रदिप्त झाली होती, व त्यांच्या मुखावर एक विशेष प्रकारचें तेज चमकत होतें. त्यांची सौम्य मूर्ति व प्रसन्न वदन पाहून पाहणारा चित्त आनंदमय हो- ऊन जात असे. अपवित्र व कुकल्पना मनांत असलेल्या कुजनां- च्याहि मनांत त्यांना पाहून साधुत्व उत्पन्न होई. अनेकवार त्यांचें दर्शन घेऊनही मनाची कधीं तृप्ति होत नसे. सीतेला त्यांचे दर्शन होतांच, देवांप्रमाणं यांची सदैव पूजा करावी ' असेच तिला वाटे. सीतेनें आपल्या देवरूप पतीचे दर्शन घेतांच मनांतल्यामनांत त्याच्या चरणकमलांवर आपला देह अर्पण केला.
 आतां रामचंद्राविषयी पाहूं. नववधू सीतेला प्रथमच पाहिल्या- बरोबर रामचंद्राच्या मनांत जो भाव उत्पन्न झाला, तो वर्णन करत येत नाहीं. तो भाव लिहितां येत नाहीं एवढेच नव्हे, तर तो लिहितां येणें अशक्य आहे. कारण कीं त्या वेळीं त्याच्या मनांत जो भाव उपन्न झाला तो अनुपम व अभूतपूर्व होता. सीतेची पवित्र व सौम्य मूर्ति रामचंद्राच्या हूत्पटलावर पूर्णपणे उमटली गेली. रामचंद्राने त्या मूर्तीला देवतेप्रमाणे आपल्या हृदयमंदिरांत स्था- पिली. त्यांनी एकदां जी मूर्ति हृदयांत धारण केली, ती मग एक क्षणभर तेथून कधीं दूर केली नाहीं.
 'विवाह झाल्याबरोबर दुसरे दिवशीं वरात जाण्याची तयारी होऊं लागली. जनकानें आपल्या मुलींना व जामातांना पुष्कळ