Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पहिले कांड

१५

उचलून व त्याची प्रत्यंचा चढवून रामचंद्र बाण सोडणार इतक्यांत त्यांचे दोन तुकडे होऊन तें भूमीवर पडलें. धनुष्य प्रचंड तर खरेंच. मोडलें तेव्हां त्याचा एवढा मोठा आवाज झाला की तो ऐकून सर्व लोक क्षणभर दचकले. धनुष्यच मोडलें असें नाहीं, तर त्या- वरोवर जनक राजाचें चिंतारूप जाळेही लागलेच ताडकन तुटून गेलें.
 धनुष्य मोडलेले पाहून राजा जनकाची चिंता कोठच्या कोठें पार विलीन होऊन गेली. राजा जनकाला त्याबद्दल अत्यंत हर्ष झाला. ज्याप्रमाणें अग्नीच्या एका ठिणगीत सर्व जग भस्म करून टाकण्याची शक्ति असते, त्याप्रमाणे रामचंद्राच्या सुकोमल शरिरांत अपार व- लविक्रम असलेला पाहून तो त्यांची प्रशंसा करूं लागला. त्यांतच आपली प्रतिज्ञा खरी झालेली पाहून त्यास पराकाष्ठेचा आनंद झाला. जेव्हां हें शुभ वर्तमान सर्व मिथिलेंत पसरलें तेव्हां सर्व लोक आनं- दांत निमग्न झाले. लागलेंच बरोबर मंगल उत्सव सुरू झाले. वाचें वाजूं लागलीं, व मंगलगीतें ऐकू येऊ लागली. जनकाच्या राज- महालांत सर्वत्र आनंदीआनंद पसरला, व सीतेच्या विवाहाची तयारी सुरू झाली. जरी जनकपूर स्वच्छ व सुंदर होतें, तरी सीतेच्या या विवाहोत्सवाच्या प्रसंगी सर्व लोक आपापली निवासस्थानें गंगारूं लागले. सर्व राजपथ स्वच्छ करून व शंगारून सज्ज केले.<br.  नंतर राजा जनकानें विश्वामित्राची आज्ञा घेऊन है शुभ वर्त - मान कळविण्याकरितां चतुर दूतांस शीघ्रगामी रथांत बसवून अयो- ध्येत पाठविले. दूतांनीं अयोध्येस लवकरच पोहचून रामलक्ष्मणाचें कुशलवृत्त व रामहस्ते झालेला धनुष्यभंग या गोष्टी दशरथास कळविल्या. आपल्या पुत्रांचा कुशल समाचार ऐकून राजा दशरथास फारच आनंद झाला. ते राजा जनकाच्या निमंत्रणाप्रमाणे रामचं- द्राच्या विवाहाकरितां वन्हाडासह जनकपुरास जाण्यास निघाले. चऱ्हाड मंडळी लवकरच मोठ्या समारंभाने जनकपुरास पोहोंचली.