Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पहिले कांड.

व सरासरी एक वर्षपर्यंत चाललें होतें. शेवटी त्याही युद्धांत राजे लोक हरले व राजर्षिजनकाला पुनः विजयश्रीने वरिलें. या युद्धांत विजय मिळाल्यामुळे राजा जनकाला अत्यंत आनंद झाला हें खरें, परंतु तेव्हांपासून आपली प्रतिज्ञा खरी कशी होईल, अशी मात्र त्यास चिंता लागली. कांहीं दिवसांनी राजर्षि जनकाने एका यज्ञा- अनुष्ठानाला आरंभ केला. त्या महोत्सवास येण्याकरितां त्याने अनेक देशांतील ऋषि, मुनि, व तपस्वी यांना निमंत्रण पाठविलें. त्याप्रमाणे दूरदूरचे अनेक ऋषि, मुनि, व ब्राह्मण येऊन त्या यज्ञोत्सवांत सं- मेलित झाले. त्या वेळेस यज्ञभूमीची शोभा पाहण्यासारखी होती. कोठें वेदपाठी वेदघोष करीत होते. कोठें होता जन 'स्वाहा' म्हणून प्रज्वलित अग्निकुंडामध्ये सुगंधित चरूची आहुती टाकीत होते. कोठें दर्शनेच्छु लोक यज्ञकर्म व महातेजस्वी ऋषिमुनींच्या संघांचे दर्शन घेऊन आपल्या जन्माचें साफल्य झालें असें मानीत होते. राजाज- नक यज्ञानुष्ठान व येणाऱ्या लोकांचे स्वागत करण्यांत निमग्न झाले होते. त्या वेळेस त्यांना असें वर्तमान कळलें कीं, आपल्या शिष्यां- सह महर्षि विश्वामित्र देखील यज्ञोत्सवाकरितां आले आहेत. हे ऐक. तांच राजार्थं जनक आपल्या पुरोहित व मंत्र्यांना पुढे करून आपण विश्वामित्राच्या भेटीकरितां निघाला. जनकानें त्या महार्ष विश्वामि- मित्राला पाहतांच प्रणाम केला व योग्य रितीनें त्यांस अर्ध्यपाद्य दे- ऊन बसण्यास आसन दिले. दोघांनाही भेटून आनंद झाला. कुशल- प्रश्न झाल्यावर महर्षि विश्वामित्र राजा जनकाने दिलेल्या आस- नावर बसले; ते बसल्यानंतर राजा जनक व इतर मंडळीही तेथेंच शेजारी बसली.
 महर्षि विश्वामित्राच्या शिष्य मंडळींत दोन धनुर्धारी वीरकु.-. मार पाहून जनक राजाला फार आश्चर्य वाटलें. मृगचर्मधारी, फला- हारी व वनविहारी तपस्वयांच्यामध्ये प्रासादविहारी, व शस्त्रास्त्रधारी