२२७
आपण हिला आज्ञा कराल, तर ही आपल्या सच्चरित्राचा परिचय सर्वांना येथेच करून देईल. '
त्यावर रामचंद्र म्हणाले, ' भगवन्, आपले म्हणणें यथार्थ आहे. आपण म्हणतां तशी जानकी पवित्र आहे. लंका विजय केल्यावर मी सर्वांना हिच्या पवित्रपणाची साक्ष पटवून दिली होती; परंतु हे महर्षे, लोकनिंदा फार प्रबल आहे. मी फक्त लोकनिंदेच्याच भयाने तिला वनांत पाटवून दिली होती. दुसरें कांहीं कारण नव्हतें. मी या वेळेसही हिला निष्पापच समजत आहे. पण लोकापवादाच्या भीतीनेंच आतां मी हिचा स्वीकार करूं शकत नाहीं. '
जेव्हां सीतादेवीने पाहिले कीं, ज्या अथीं आपणाला शुद्ध समजून हि केवळ खोट्या लोकनिंदेच्या भयानें रामचंद्र आपला स्वीकार करीत नाहींत, त्या अर्थी आतां जगण्यांत तरी अर्थ काय ! आतां मरणच योग्य आहे. ' असा मनाशी विचार करून ती भर संत रामचंद्रासमोर अधोमुख करून पृथ्वी मातेची प्रार्थना करूं लागली. 'हे धरणी माते, तूंच माझी जननी आहेस. तुझ्याच लालनपालनाने मी लहानाची मोठी झालें, आणि म्हणूनच माझा देह तुझ्या विराट स्वरूपांत मिळून जावा, असे मला वाटतें. आतां मी क्षणभरहि जिवंत राहण्याची इच्छा करीत नाहीं. हे माते, पतीने माझा त्याग केल्यावर जणूं काय माझा सर्व जगानेंच त्याग केला आहे. आतां मला फक्त तुझाच आश्रय आहे. का, तूं आपल्या दु:खी कन्येला निरंतरची मांडीवर घेणार नाहींस ? नाहीं, नाहीं. माते, आतां माझें हें शरीर निरंतरकरितां तंच मांडीवर घेशील, हा माझा पूर्ण विश्वास आहे. हे पंचभौतिक देहा, आतां कां बाबा, उगीच वेळ लावतोस ? हे भगवन्, परमात्मन्, तूं अंतर्यामी सदैव जागृत आहेस. जर मी खरी निष्पाप असेन, जर मी रामचं- द्रावांचून दुसन्या पुरुषाचें स्वप्नांतहि कधीं ध्यान केलें नसेन, आणि