Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/२५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२६
सीताचरित्र.

ल्यादि वृद्ध राण्यांनाहि त्यांना पाहून तसे वाटल्याखेरीज राहिले नाहीं.
 जेव्हां रामचंद्राची याविषयी पक्की खात्री झाली, तेव्हां त्यांनी वाल्मिकींना बोलावून आणून सांगितले, ' भगवन्, जानकी जर शुद्ध आहे, सच्चरित्रा आहे, तर तिनें आपल्या शुद्धतेचा, व सच्चरित्राचा परिचय येथे येऊन सर्वांना प्रत्यक्ष करून द्यावा येथें येऊन तिनें लोकांत पसरलेला मिथ्यापवाद दूर करावा,' असें माझें तिला सांगणे आहे. हा माझा निरोप आपण तिला कळवावा.
 दुसरे दिवशीं पुनः सभा भरली. तेथें ऋषि, मुनि, राजे, मंत्री वगैरे सर्व लोक जमले होते. त्या यज्ञोत्सवाला. सुग्रीव, हनुमान, विभीषण वगैरे मित्रांनाहि बोलाविलें होतें. तेहि त्याप्रमाणें तेथें आले होते.
 समेत जमलेले लोक आपापसांत निरनिराळ्या गोष्टी करूं लागले. इतक्यांत सीतादेवीला घेऊन महर्षि वाल्मीकि समेत आले. पुढे वाल्मीकि, व त्यांच्या मागून जानकी येत होती. जानकी त्या वेळी कापाय वस्त्र नेसली होती. आपल्या स्वामीच्या विरहानें आणि तपश्चर्येने जरी ती अगदीं कृश झाली होती, तरी तिच्या मुखमंडलावर पातिव्रत्याचं विलक्षण तेज चमकत होते. सीतेची ती दशा पाहून सर्व सभा सजलनयन होऊन तिच्याकरितां दुःख करूं लागली.
 सभेत आल्यावर वाल्मीकि मुनींनी रामचंद्राला 'हटलें, राजन्, ही आपली धर्मपत्नी सीता आहे. हे दावे कुमार आपलेच आहेत. माझ्याच आश्रमांत यांचें जातकर्म झाले. हे धनु- विद्येत निपुण आहेत. सीतादेवी अगदी निष्पाप आहे, हें मी खरें, आणि खात्रीने सांगतों. आपणहि हिला शुद्धच समजत आहांत. "केवळ लोकनिंदेच्या भगानेंच आपण हिचा त्याग केलात. जर