Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/२५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सातवें कांड.

२२५

प्रमाणे कुश, लव, निरनिराळ्या जनसमुदायांमध्ये जाऊन तें रामायण काव्य गाऊन दाखवू लागले. ज्यांनी ज्यांनीं त्यांचें गाणें ऐकिलें ते ते सर्व मोहित होऊन गेले. ते ज्या ज्या ठिकाणीं आपलें गायन सुरू करीत त्या त्या ठिकाणीं तें ऐकण्यास मनुष्यांची अगदीं गर्दी जमे.
 जेव्हां त्यांच्या गाण्याची प्रशंसा रामचंद्राच्या कानांवर गेली, तेव्हां त्यांनी त्यांना सभेत गावयास बोलाविलें. त्यांच्या आज्ञे- प्रमाणे ते समेंत येऊन ' रामायण ' गाऊं लागले. त्यांचें गाणें ऐकणे तर दूरच राहिलें, परंतु त्यांचे सौंदर्य व आपल्या तारखेंच रूप पाहून रामचंद्राचें हृदय प्रेमाने भरून आलें. त्यांना पाहतांच रामचंद्राच्या दृष्टीसमोर सीतादेवीची मूर्ति उभी राहिली. हे दोघे कुमार सीतादेवीचेच आहेत, हे ते मनांत समजले. आपल्या पुत्रांना तपस्व्याच्या वेषांत पाहून रामचंद्राच्या नेत्रांना पाणी आलें. ते आपला प्रेमप्रवाह थांबवूं शकले नाहीत. त्यांनी ताबडतोब सभा विसर्जन करून त्यांना सांगितलें कीं, ' आतां तुम्ही जा. आणखी एखादे दिवशीं सवड झाली म्हणजे मी तुमचे गाणे ऐकेन. इतकें सांगून व त्यांच्या गाण्याची पुष्कळ प्रशंसा करून कोषाध्यक्षाला त्यांना विपुल द्रव्य देण्याची त्यांनी आज्ञा केली. परंतु आपल्या गुरुजीच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते घेतले नाही. त्यांची ती निर्दो- भता पाहून रामचंद्राला अत्यंत विस्मय वाटला; व त्यांचा जास्त परिचय करून घ्यावा असें त्यांना वाटलें. त्यांनी तशी आपली इच्छा दर्शवितांच, ते दोघे कुमार त्यांच्या पुढे हात जोडून मोठ्या नम्रपणे म्हणाले, 'महाराज, आम्ही वाल्मीकि मुनीचे शिष्य आहोत, असे जरी त्यांनी सांगितलें तरी हे दोघे कुमार जानकीचे पुत्र आहेत, असेंच त्यांना खात्रीपूर्वक वाटले. त्यांनाच एकट्याला असें वाटलें इतकेंच नव्हे, तर भरत, लक्ष्मण यांनाहि तसेंच वाटलें. कौस-