की, मुनिकन्या व मुनिपत्न्या यांच्या सत्कारानें आनंदित होऊन आपले दिवस तेथे कंठूं लागली.
जरी सीतादेवीनें वाल्मीकीच्या आश्रमांत राहून अनेक प्रका र प्राकृतिक सौंदर्य पाहिले, अनेक वन्य पदार्थांचे सेवन केलें, तसेच जरी अनेक गोष्टींचे निरक्षण केले, तरी तिच्या पतिविरहा- नल हृदयाला केव्हांहि शांति मिळाली नाहीं. पतिव्रता स्त्रीला पती- शिवाय सुख व शांती कोठून मिळणार बरें ? कोठूनहि मिळणार नाहीं. याच कारणामुळे अमावस्येच्या निश्चंद्रिका रात्रीप्रमाणे सीता- देवीहि आपले अंधकारमय जीवन घालवू लागली.
लोकापवादाच्या भीतीनें रामचंद्रांनीं सीतेला नगरीतून काढून वनांत पाठवून दिलें खरें, परंतु ते तिला आपल्या हृदयमंदिरांतून मात्र काढून टाकू शकले नाहीत. सीतेनें आपल्या सद्गुणांनी त्यांचे मन इतके आकर्षून टाकिलें होतें, त्यांचें अंतःकरण इतके व्यापून टाकले होतें कीं, त्यांच्या मनांत नेहमीं सीतेचीच मूर्ति वसत होती. दोघे हि परस्पर अनुरागाच्या बंधनाने इतकी बांधिली गेली होती कीं, तीं एकमेकांला क्षणभर देखील विसरत नसत. शरिरानें तीं दोघें भिन्न होती. पण मनानें मुळींच नव्हती. सीतेच्या वियोगानें रामचंद्राला जें दुःख झाले, तें येथें लिहवत नाहीं. वनांत, गंगेच्या काठी जशी सीता शोक करीत होती, तसेच तेहि अयोध्येत दुःख करीत होते. आपल्या प्रियेशिवाय सर्व ऐश्वर्यसंपन्न अयोध्या- नगरी त्यांना निर्जनवनाप्रमाणे दुःखदायिनी वाटू लागली. त्यांचें मन इतकें एखादे वेळी भडकून जाई कीं, ते शेवटीं शोकसागरांत नमन होऊन जात. त्यांचें मन मग कोणत्याच कामांत लागत नसे. ते कोणालाहि भेटत नसत, कोणाचे कांहीं ऐकत नसत, व राजकार्यहि करीत नसत. ' शुद्धाचारिणी, व निरपराधिनी, जनक- नंदिनीला लोकापवादाच्या भीतीनें मी वनांत नेऊन सोडिली, '
पान:सीताचरित्र.pdf/२५०
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२०
सीताचरित्र.