२१३
निरपराधिनी, प्रेमाची प्रतिमा, प्रियतमा जानकी मी घरांतून कशी बाहेर काढून लावू ? प्रियेशिवाय मी कसा जिवंत राहीन ? मला मृत्यु कां बरें येत नाहीं ? जानकीचा त्याग करून राजा जन- काला मी कसे तोंड दाखवूं ! हा लोकापवादरूपी कलंक जानकी- चा त्याग केल्याशिवाय धुवून टाकर्णे अगदीं असंभाव्य आहे. हाय ! प्रिये जानकी, हा रामजीविते, हा प्राणप्रिये, तुला मी कसे वेगळे ठेवूं ?' याप्रमाणे सीतेच्या दुःखाने रामचंद्र अगदीं विन्हल होऊन गेले.
इतक्यांत भरत व लक्ष्मणहि तेथे येऊन पोहचले. दुरूनच राम- चंद्राला दु:खी पाहून त्यांच्या मनांत नानाप्रकारच्या कल्पना उद्भ- वल्या. ते जवळ येतांच रामचंद्राचा दुःखावेग अधिकच वाढला. थोड्या वेळाने दुःख आंवरून त्यांनीं सीतेवर आलेल्या अपवादाची गोष्ट त्यांना सांगितली. नंतर ते लक्ष्मणाला म्हणाले, ' बा लक्ष्मणा, आपल्या अनुपस्थितीत दुष्ट रावणाने पंचवटींतून जानकीला चोरून नेलें होतें. त्या अपमानाचा बदला त्याला रणांत ठार मारून आह्मी घेतला. तो मेल्यावर जेव्हां माझ्या सन्निन्द्ध जानकीला घरीं आणिले होतें, तेव्हां तिच्या चरित्राबद्दल मी संदेह प्रकट केला होता. त्याचें कारण तिचें चरित्र कलंकित होते म्हणून नव्हे; तिच्या पवित्रपणावर, सदाचारावर, माझा पूर्ण भरंवसा होता. मी तिला नेहमीं निष्पाप समजतों, परंतु अपयश दूर करण्याकरितां केवळ लोकोपचाराच्या विचाराने मी तिच्या शुद्ध चरित्राबद्दल त्या वेळी शंका प्रदर्शित केली होती. ती शंकाहि जानकीने दिव्य करून सर्वासमक्ष दूर केली. देव, ऋषि, आणि मुनि या सर्वांनी सर्वजनांसमोर जेव्हां जानकी शुद्ध आहे असे सांगितले, तेव्हांच मी तिचा स्वीकार केला. परंतु मोठ्या खेदाची गोष्ट आहे कीं, अजूनही कांहीं लोक जानकीला पाप- दूषित समजतात.