Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सहावे कांड.

२०५.

क्यांत महावीर लक्ष्मणानें येऊन रामचंद्र, लक्ष्मण, व सीता यांना प्रणाम केला. मग समोरच आपल्या माता उभ्या आहेत, असे पाहून प्रथम त्यांनी कैकयीला प्रणाम करून नंतर कौसल्या व सुमित्रा यांना आनंदविलें.
नंतर रामचंद्रांनी आपल्या प्रेमपूर्वक दृष्टीने जमलेल्या सर्व नगरवासी जनांकडे पाहून प्रसन्न मनाने त्यांचे स्वागत केलें, व त्यांचा कुशल समाचार विचारिला. सर्व लोकांनीहि त्यांचें मनः- पूर्वक अभिनंदन केलें.
या संमीलनोत्सवानंतर धर्मात्म्या भरतानें त्यांच्या पूर्वी आण- •लेल्या पादुका आणून रामचंद्राच्यापुढे ठेविल्या; व त्या त्यांच्या पायांत आपल्या हाताने घालून तो मोठ्या नम्रपणाने म्हणाला, ' हे नाथ, आपण जे आपले राज्य काही दिवसांकरितां माझ्या स्वाधीन केले होतें, तें मी आतां आपल्याला अर्पण करतो. आपण त्याचा आतां स्वीकार करा. आपण आज अयोध्येत आलांत, हे पाहून मला आनंद वाटतो. आज माझ्या जन्माचें सार्थक झाले. आता आपण आपला कोश, सेना, इत्यादि सर्व संभाळा. आपल्या कृपेनें मी आपला खजिना दसपट वाढविला आहे.
नंतर भरताच्या आज्ञेनें रामचंद्राच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. त्यांचे गुरु वसिष्ठ यांनीं या उत्सवाकरितां विजय, जाबालि, कश्यप, गौतम, आणि वामदेव आदिकरून ऋषि-मुनींना निमंत्रण पाठवून बोलाविलें. या सर्व ऋषि-मुनींनी मिळून वेदोक्त विधप्रमाणे रामचंद्राला राज्याभिषेक केला. रामचंद्र राजसिंहासना- वर बसल्यावर सर्व प्रजाजन आपणास सनाथ समजू लागले. राम. चंद्राच्या राज्याभिषेकाचा उत्सव सर्व राज्यांत मोठ्या आनंदानें आणि थाटाने साजरा करण्यांत आला.
राजसिंहासनावर बसल्यानंतर रामचंद्रांनी सुग्रीव, अंगद, बिभी-