चालले. तेव्हां नल, नील वगैरे वीरांनी समुद्रावर बांधलेला सेतु पाहून सीतेला फार आनंद झाला.
मार्गात जी जी प्रसिद्ध स्थळे दिसत, तीं तीं रामचंद्र सीतेला मुद्दाम दाखवीत असत. समुद्राच्या उत्तर तीरावरच्या बाजूला होऊन नंतर विमान किष्किंधेकडे चाललें. थोड्याच वेळांत ते किष्किंधेला येऊन पोहोंचलें. तेथें पोहोचतांच सीतादेवीनें सुग्रीवादिकांच्या स्त्रियांनाहि आपल्याबरोबर अयोध्येस नेण्याची इच्छा दर्शविली. तिची तशी इच्छा पाहून रामचंद्रांनी विमान खाली उतरविलें. विमान खाली उतरतांच तारा व रुमा इत्यादि सुग्रीवाच्या स्त्रियाहि विमा- नांत बसल्या.
नंतर विमान पुनः आकाशांत उडाले, व अयोध्येकडे चालले. ऋष्यमूक पर्वताजवळ पोहचतांच रामचंद्रांनीं सीतेला सांगितलें कीं, याच ठिकाणीं किकिधेचा नरेश सुग्रीव याच्याबरोबर मैत्री झाली, मग पंपासरोवराचें वर्णन करून ते म्हणाले, ' तुझा वियोग झाल्या- मुळे तुझ्याकरितां मी येथेच विलाप केला. ' त्यावर महातपस्विनी शबरीचा आश्रम लागला. तो दाखवून तेथेंच कबंध राक्षसाला मार- लेलें ठिकाण होतें, तेंहि त्यांनी दाखविलें. तेथून किंचित् अंतरावर पुढे विमान गेलें. इतक्यांत पवित्रतीरा परम पावन गोदावरी नदी दिसू लागली. तिचें दर्शन घेऊन मग ते पंचवटीजवळ जाऊन पोंह- चले. तेथें जातांच रामचंद्रांनी आपली रहाण्याची पर्णकुटी दाख- विली. त्यानंतर महामुनि अगस्ति, महात्मा शरभंग, सुतक्ष्ण, आणि अत्रि मुनि, यांचे आश्रम लागले. त्यांचे दर्शन करून ते चित्रकूटा- जवळ येऊन पोहचले. तेथून प्रयागास जाऊन व गंगायमुनांचा आल्हादजनक संगम पाहून सर्वांना फार आनंद झाला. इतक्यांत भारद्वाज ऋषीचा आश्रम आला. तेथें रामचंद्रांनी विमान खाली उतरविलें. विमान खालीं उतरतांच त्यांतून उतरून रामचंद्रांनी
पान:सीताचरित्र.pdf/२३२
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०२
सीताचरित्र