Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सहावे कांड.

२०१

पताका फडकत होत्या. त्याच्यांत सुवर्णाचें खोदीव काम केले होतें. तशांत त्यांत एक नव्हे, तर अनेक जागा केल्या होत्या; त्यांत सर्व प्रकारच्या सोयी होत्या. त्या विमानाच्या एका कोप- यांत एक मोठे पुस्तकालयहि होतें. त्यांत सर्व प्रकारचीं पुस्तकें ठेविली होती. त्याचप्रमाणें त्यांत भोजनालय, पाकशाला, व्याया- - मशाला, शयनगृह वगैरे सर्व शाला उत्तम रीतीने तयार केल्या होत्या. बसण्याकरितां नरम गाद्या घातल्या होत्या. जागजागी पुष्पांचे गुच्छ ठेविले होते. सर्व विमानांत दिव्य सुगंध भरला होता. त्याचे वर्णन कोठवर करावें तें विमान सर्व प्रकारच्या सुखाचे केवळ स्थानच होतें. असो.
 विमान आल्यावर जेव्हां रामचंद्र त्यांत सीता, लक्ष्मणासह बसून जाण्यास तयार झाले, तेव्हां बिभीषण आदिकरून राक्षस, त्याचप्रमाणें सुग्रीव, त्याचे मंत्री, सेनापति, आणि त्याची सेना वगैरे सर्व जणांनी रामचंद्राबरोबर अयोध्येला चलण्याची आपली इच्छा प्रगट केली. रामचंद्रांनीहि त्यांची मनापासून इच्छा पाहून त्यांस बरोबर येण्याची आज्ञा दिली. सर्व लोक जाण्यास आनंदाने तयार झाले. प्रथम रामचंद्रांनीं सीतेला हातीं धरून विमानात चढविलें. नंतर लक्ष्मणासह ते आपण त्यांत बसले. त्यांच्या मागून सुग्रीव, विभीषण, व हनुमान इत्यादि चढले. सर्व लोक आपापल्या आसनावर प्रशस्तपणें बसल्यावर रामचंद्राच्या आज्ञेनें विमान आकाशमार्गे चालू लागले.
 जेव्हां पुष्पक विमान आकाशांत उडाले, तेव्हां खालीं लंका, युद्धभूमि वगैरे दृश्य पदार्थ स्पष्टपणे दिसूं लागले. ज्या ठिकाणी मुख्य मुख्य गोष्टी घडल्या ती सर्व स्थलें आणि रणभूमि राम- चंद्रांनी सीतेला बोटांनी दाखविली. नंतर विमान उत्तर दिशेला