Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/२२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सहावें कांड. ही देववाणी ऐकून रामचंद्र आनंदित होऊन, सीतेला करण्यास तयार झाले. त्यांनी तिला चिर्तेतून बाहेर काढिले. नंतर त्यांनी सर्व देवतांच्या साक्षीनें, व सर्वासमोर सीतेचें ग्रहण ज्या वेळेस रामचंद्रांनी सीतेचा आदरपूर्वक स्वीकार केला, त्या वेळेस सर्वत्र आनंदीआनंद पसरला. सर्व लोक हर्षानें नाचू लागले. विमानांत बसलेल्या देवगणांनी आकाशांतून त्यांच्यावर पुष्पवृष्टि करण्यास सुरवात केली. रामचंद्राच्या आणि सीतेच्या जयध्वनीनें चारी दिशा दणाणून गेल्या. इतके दिवस इतकी आपत्ति सहन केल्यावर आपल्या प्राणेश्वराची भेट झाल्यामुळे सीतेला जो आनंद झाला, तो अनिर्वचनीय होता. त्या दांपत्यसंमीलनाचे पूर्णपणे वर्णन कोण करूं शकेल ? इतकी आमच्या लेखणीत शक्ति नाहीं. १९९ वर आम्ही लिहिले आहे कीं, रामचंद्रांनी मोठ्या बुद्धिमत्तेनें आणि चातुर्याने सीतेची शुद्धता चांगल्या रीतीनें सर्वांच्या नजरेस वाटे ती निश्चल साची । तिजविण जगतीं । नाहीं सुगति । कपि सुहृदारे ॥ कां मौन० ॥ २ ॥ या जनकसुतेचा वाली, द्विशिर हा आतां । राखील हिची तो शुचिता । पातंचरणीं ठेवुनि माथा । जोडुनि हस्ता। जाहली सिद्ध-माहदुहिता ॥ चाल | उदरीं बा, घे कन्येसी । म्हणुनियां तनू अग्रीसी । अर्पिली तिनें त्यासरसी । मौन, ॥ ३ ॥ गडबड झाली । कपिदळिं समुळी | भूमि थरारे ॥ पाहुनी सत्व सति, प्रगट भग झाला । नारायण, कथी रामाला | ही मूर्ति शुचि सत्वाची । घेई हिजला | सोडुनी सर्व शंकेला । चाल । मम कन्या ऐसें मानी । ऐकतांचि ती सद्राणी | रामानें आलिंगुनी । श्रम परिहरिले । तिज सुखवीलें । गुणगंभीरे ॥ कां मौन० ॥ ४ ॥