Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/२२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९८ सीताचरित्र. सर्वस्वी पवित्र आहे. तूं तिचें ग्रहण कर. आली समस्त देवगण सीतेच्या पवित्रतेबद्दल सही आहोत. आम्ही धर्माला साक्षी ठेवून निश्चयपूर्वक सांगतों कीं, 'सीतेनें मनानें, वाचेनें, व शरिरानें, कोणत्याही प्रकाराने आपल्या चरित्राला दूषित केलें नाहीं. पराधीन असतांहि तिनें तुझे ध्यान सोडले नाही. घोर रूपिणी राक्षसींनी हिचं मन वळविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु हिने धर्मरक्षणा- करितां त्यांची एकही गाष्टे मान्य केली नाहीं. हिचे आंतरिक भावहि विशुद्ध आणि पवित्र आहेत. याकरितां आम्ही सर्वजण आग्रहपूर्वक तुला सांगतों कीं, तूं हिचा स्वीकार कर हिच्या चार- त्रासंबंधानें तूं लेशमात्रहि संदेह धरूं नकोस.' टीप - या गोड प्रसंगावर रा. अनंत नारायण भागवत यांनी एक मुलींना म्हणण्यासारखे गाणें केले आहे, तें या ठिकाणी देणें अवश्य बाट ल्यावरून देत आहे. गाणे. चालः- (हे सीते कोमल गात्रे, अतिसकुमारे, कुठें लपालस जनक कुमारे ). रणधीरा, रघुकुलतिलका, रिपुहननारे । का मौन आजिं धरिलें रे ॥ धु० ॥ कंठांत धरुनि प्राणास । भेटिची आस । ठेविली मोठी । तव चरणीं लावुनि दृष्टि ॥ तूं जाणसि मन्मन सारें । कोप कां करिसी । हें दुःख होतसे मजसी || चाल परगृहीं वास मज घडला । हा काय दोष मम झाला । मी हीन दीन ही अवला । करूं गत कैसी । सांगा मजसी । बलजलधेरे ॥ कां मानें ● ॥ १ ॥ मी समजे प्राणापरिस, शील भम थोर । त्यागीन दूषिता शरिर || नच चाड मला अन्याची, खास महिवर । तब कृपाछत्र, चामर ॥ चाल ( साध्वीसी पतिप्रेमाची | जोडचि की सुरल्लोकींची । (पान एकसे नव्याण्णव पाहा.)