१९५
लून नर्ल, हें सर्व जगाला माहित आहे. त्याच्या शरिराचा स्पर्श तुझ्या अंगाला झाला आहे, हेंही सर्वांना ठाऊक आहे; तर मग मी आपल्या निर्दोष कुलाचा विचार करून तुझा अंगिकार कसा करीन. तुझ्या सुटकेकरितां व उद्धाराकरितां मी जे कांहीं श्रम, उद्योग, आणि प्रयास केले ते सर्व फलद्रूप झाले. तुझा मी अंगिकार करावा अशी अवश्यकता मला दिसून येत नाहीं. तूं आतां तुला वाटेल तिकडे चालती हो. '
आपल्या देवाच्या तोंडचें असें वज्रघातासारखें कठोर भाषण ऐकून सीतेचें हृदय कांपू लागले. तिचें मस्तक फिरूं लागून तिच्या डोळ्यांना अंधेरी आली. त्या वेळेस तिला मरणापेक्षाही अधिक दुःख झालें. तिच्या मस्तकावर तेव्हां वज्राघात झाला असता, तरी सुद्धां तिला तितकें दु:ख झालें नसतें, इतकें दुःख तिला रामचंद्रा- च्या या कठोर भाषणाने वाटले. हाय, हाय, सीतेचें सर्व सुखस्वप्न एकदम भंग पावलें. तिच्या सर्व आशालतांवर अग्निकणांचा वर्षाव झाला. तिच्या सर्व शुभ संकल्पावर विद्युत्पात झाला. ती लज्जेनें मेल्याप्रमाणे झाली. ती डोळ्यांत पाणी आणून रडूं लागली. नंतर ती तोंड झांकून गद्गदवाणीनें म्हणाली, 'महाराज, ज्याप्रमाणें एखादा नीच पुरुष साधारण नीच स्त्रीला कटु भाषण बोलतो, त्याप्रमाणें आपण या वेळी महा बोलत आहात. आपण मला जशी हलकी समजतां तशी मी नाहीं वरें. हलक्या वृत्तीच्या साधारण स्त्रीप्रमाणें मी आपला धर्म बुडविणार नाहीं. आपण माझ्या भाषणावर विश्वास ठेवावा. नीच स्त्रियांचें अपवित्र आचरण पाहून माझ्या पवित्र आचरणाला आपण दोष लावितां, ही फार अयोग्य गोष्ट आहे. जेव्हां मी आपल्या पवित्रपणाचें प्रत्यक्ष प्रमाण दाखवीन, तेव्हां र आपण माझें चरित्र दूषित समजणार नाही ना ? रावणाच्या ज्या अंगस्पर्शाबद्दल आपण बोललांत ती गोष्ट आपत्कालची होय. मी