समुद्रयात्रा सफल झाली. मित्र सुग्रिवाच्या सर्व प्रयत्नाला यश आले, आणि महामति विभीषणाचे सत्पमरार्श आणि परिश्रम सिद्ध झाले.'
रामचंद्राचे हे गंभीर भाषण ऐकून सीतेच्या नेत्रांत अश्रु उमे राहिले. जेव्हां रामचंद्रांनीं सीतेच्या मुखाकडे पाहिले, तेव्हां तिचे सजलनयन पाहून त्यांचेहि हृदय कंपित झालें. ते आपले मनोवि- कार त्या वेळी मोठ्या धैर्याने दाबून तिला म्हणाले, ' हे जानकी, अपमानाची फेड करण्याकरितां मानधन मनुष्याचें जें कर्तव्य होते, तें सर्व मी केले आहे. रावणावरोवर में करण मला उचित होतें, तें मी केले आहे. त्याला मारून मी कृतकृत्य झालों. आपल्या मित्रांच्या भुजबलाच्या सहाय्याने हा जो मीं शत्रूचा नाश करून विजय मिळविला, तो केवळ तुझ्याचकरितां नाहीं, हें पक्के लक्षांत ठेव. तुझ्या प्राप्तीकरितां मीं हें घोर युद्ध केव्हांच केलें नाहीं. मी जें हैं सर्व केलें, तें केवळ स्वतःच्या चरित्ररक्षणाकरितांच केले आहे. जनापवाद दूर करण्याकरितां व आपल्या प्रख्यात वंशाला लाग- लेला डाग धुवून टाकण्याकरितां मला हे सर्व करावें लागले. तुझ्या चरित्रासंबंधाने मला संदेह उत्पन्न होतो. कारण तूं परक्याच्या घरीं रहात होतीस. तूं या वेळेस माझ्या समोर उभी आहेस हें खरें आहे, तथापि ज्याप्रमाणे डोळे दुखणारा मनुष्य उजेडाकडे पाहूं शकत नाहीं, त्याच्या डोळ्यांना प्रकाश सहन होत नाहीं, त्या- प्रमाणेच तूं समोर उभी असल्याने माझी स्थिति झाली आहे. आतां तूं माझ्या डोळ्यांना खपत नाहींस; याकरितां तुला सांगतों की, तूं वाटेल तिकडे खुशाल जा, आतां तूं मला दृष्टीसमोरही नको आहेस. स्वतः तूं बुद्धिमान आहेस. असा कोण सत्कुलाभि- मांनी असेल की जो दुसऱ्याच्या घरी राहिलेल्या आपल्या स्त्रीचा अंगीकार करील ? याचा तूं स्वतःच विचार कर. रावणानें तुला उच-
पान:सीताचरित्र.pdf/२२४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९४
सीताचरित्र.