Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८२
सीताचरित्र.

माया होती, ' अशी सीतेचीहि खात्री झाली. सरमेनें तिलाही गोष्ट सांगितल्याबद्दल सीतेने तिची पुष्कळ प्रशंसा केली. ती तिला म्हणाली, 'भगिनी, या तुझ्या उपकाराबद्दल मी तुझी ऋणी आहे. पण या दुष्ट रावणाच्या कचाट्यांतून तुझ्या अहेतुक कृपनें मी केव्हां मुटेन, आणि तुझ्या उपकाराची फेड मी केव्हां करीन, तो आनंदाचा दिवस केव्हां पाहीन, हें मला माहीत नाहीं. तें एक परमेश्वरच जाणे.'
 त्यानंतर लवकरच रामचंद्राच्या आणि रावणाच्या सैन्यांत घन-- घोर युद्ध सुरू झालें. राजा सुग्रीवाचे महावीर सैनिक आपल्या जिवाची पर्वा न करितां युद्ध करूं लागले. त्यांनीं रावणाचे कित्येक वीर पाडाव केले. असंख्य वीर रणभूमीवर पडून वीर गतीला गेले.. तेथील भूमि रक्तानें लाल होऊन गेली. रक्तमांसाचा नुसता तेथे चिखल झाला होता.

 असे दोन्ही सैन्यांचे घनघोर युद्ध बरेच दिवस चाललें असतां, एके दिवशी रावणाकडील वीर पुष्कळ मारले गेले. तेव्हां रावणाला वाईट वाटून त्यानें आपल्या पराक्रमी पुत्र इंद्रजिताम आणखी सैन्य देऊन युद्धास पाठविलें. तो मोठा शूर होता. मेघाप्रमाणें गर्जना करीत तो रणभूमीवर आला, आणि त्याने रामचंद्र व लक्ष्मण यांना युद्धाकरितां बोलाविलें. ते दोघेहि तयारच होते. लगेच ते आपल सेना घेऊन आले, आणि त्याच्याशी निकराने युद्ध करूं लागले. मैत्रनादानं मोठ्या शौर्यानें युद्ध केलें. जेव्हां तो फार वेळ युद्ध करून दमला, तेव्हां त्यानें राम-लक्ष्मणांवर नागपाश टाकून त्यांस बांधून टाकिलें, आणि नंतर तो त्यांस रावणाकडे घेऊन चालला. आपल्या पुत्राचा हा विजय ऐकून रावणाला अत्यानंद झाला. त्यानें भर सभेत आपल्या पुत्राची पुष्कळ प्रशंसा केली. इंद्रजिताने उभयतां रामलक्ष्मणाला बांधून टाकिलें, अशी अमोल संधी रावण फुकट थोडीच