Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पहिले कांड.

ही कोणी महातेजस्वी देवकन्या आहे. सीतादेवीचें अलौकिक सौं- दर्य शांत स्वभाव, व सरलता, कोमलतादिसद्गुण पाहून सर्व लोक म्हणत की ही राजकन्या नसून महाप्रतापशालिनी देवकन्या आहे. त्यांचा असा समज होण्याला कारणही पण तसेंच होतें. तें हें कीं, जे गुण सीतादेवीमध्ये होते, ते गुण प्राकृत मुलींत दिसून येत नसत.
 कुमारिका सीतेचा स्वभाव अति कोमल, अति मधुर व सर्वप्रिय होता. त्याला पाहून असेच ह्मणावे लागे कीं, जणू काय जनक महाराजाच्या राजमहालांत स्वर्गातून अमृतबिंदुच पडला. राजर्षि जनकाच्या राज समेंत जितके मोठमोठे तपस्वी, ऋषि, व मुनि येत होते, त्या सर्वांनी सीतेच्या पवित्र स्वभावाची, व अनुरूप लाव ण्याची प्रशंसा केली. राजर्षि जनक प्रायः प्रति दिवशीं ऋषि, मुनी- रोवर सर्खेत बसून परमार्थ तत्त्वाचा विचार करीत असत. • त्यांच्या सत दूरदूरचे अनेक तपस्वी नित्यशः येत असत, ' हैं आम्ही प्रथमच सांगून चुकलो आहोत. त्या वनवासी ऋषि, मुनी- च्या मुखांनीं तापसाश्रमाचें वर्णन ऐकून ऐकून सीतेच्या कोमल हृदयांत त्या आश्रमाचें दर्शन घेण्याची अत्यंत लालसा उत्पन्न झाली. पवित्र ऋषिकन्या व ऋषिपत्न्या यांच्या बरोवर वनांत निवास करण्याची व क्रीडा करण्याची तिची ती लालसा दिवसेंदिवस वाढत चालली. सीतेच्या मनांतील ती इच्छा ओळखून दूरदर्शी तपस्व्यांनी ही मुलगी केव्हां ना केव्हां तरी आपल्या पतीबरोबर वनांत अवश्य निवास करील असे सांगितले. खरोखरच सीतेचा कल लहानपणापासूनच प्राकृत शोभा पाहण्याकडे अधिक असे. जित- का आनंद तिला प्राकृतिक सौंदर्य पाहून होत असे, तितका दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपासून होत नसे. याच कारणामुळे सीतादेवीची चौदा वर्षेपर्यंत आपल्या स्वामींबरोबर वनांत राहून व तेथील प्राकृत