Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
पांचवें कांड.

१७७

त्याची सल्लामसलत विचारिली. राजाच्या होला हो म्हणणारे कांहीं कमी नसतात. त्याप्रमाणें रावणाच्या दरबारीहि त्याची कांहीं कमतरता नव्हती. एका विभीषणाखेरीज सर्वांनीं रावणाच्या होला हो ठेवून दिली.
 धर्मात्मा मनुष्य केव्हांच स्वस्थ बसत नाहीं. असत्य आणि अधर्म त्याला मुळींच पाहवत नाहींत. भर सभेत विभीषण राव- णाला म्हणाला, 'बंधो, आपण रामचंद्राबरोबर युद्ध करूं नका... त्यांच्याशी द्वेष केल्यानें आपलें कल्याण होणार नाहीं. जर आपण स्वतःचे आणि राज्याचें कुशल इच्छित असाल, तर माझें म्हणणे ऐका. पतित्रता सीतादेवीला त्यांच्याकडे परत पाठवून देऊन आपल्या अपराधाबद्दल क्षमा मागा. मला खास आशा आहे कीं, आपण असे केल्यावर दयालु रामचंद्र आपल्याला खात्रीनें क्षमा दान करतील. '
 'विनाशकाले विपरीत बुद्धि:' या नियमाप्रमाणे रावण का - लाच्या स्वाधीन होता. याच कारणामुळे त्यानें आपल्या धाकट्या बंधूचा अमृतमय उपदेश ऐकिला न ऐविलासा केला. इतकेंच क- रून तो थांबला नाही. त्यानें भरदरबारांत विभीषणाला लाथ मा- रून तेथून काढून दिलें. विभीषणालाहि तो अपमान सहन न हो-ऊन, तो लागलीच लंका नगरी सोडून उत्तर तीराला रामचंद्राजवळ येऊन पोहोंचला. रामचंद्रानीं विभीषणाचा शुद्धभाव पाहून त्याज बरोबर मित्रत्व केलें. त्याच्यापासून रामचंद्राला लंकेतील पुष्कळ गुप्त गोष्टी व मेद कळला.
 शेवटी मोठ्या प्रयत्नाने नल वगैरे मंडळी यांनी समुद्रावर पूल बांधिला; आणि त्यावरून सर्व सेनासमुद्र पार होऊन पलीकडे गेली. समुद्राच्य पारच लंकेची सीमा होती. रामचंद्राच्या सैन्यानें तेथे पोहोचतांच एकदम सर्व दरवाजे रोकून धरले.