Jump to content

पान:सीताचरित्र.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१७६
सीताचरित्र.

एकवार तिचे दर्शन आणि निरोप घेऊन त्याने तेथून प्रस्थान केलें.
 समुद्राच्या उत्तर तीरावर वाट पहात बसलेल्या अंगद वगैरे वी- रांनी त्याची गर्जना लांबून ऐकिली. त्याचा आवाज ऐकतांच सर्व जण आनंदाने हात हालवू लागले, इतक्यांत हनुमानहि त्यांच्याज वळ येऊन पोहोंचला.
 नंतर हनुमानाच्या मुखानें सीतेच्या शोधाची वगैरे हकिकत ऐकून त्या सर्वांना अत्यंत आनंद झाला तेथून ते सर्वजण त्याला पुढे करून रामचंद्राजवळ गेले. तेथें पोहोंचल्यावर सीतेच्या शोधाचा, समुद्रयात्रेचा आणि लंकेत घडलेल्या प्रकाराचा सर्वे वृत्तांत त्यानें रामचंद्राला सांगितला.
हनुमानाच्या तोंडून सीतेची दीन दशा, तिची पतिपरायणता, तिचा आत्महत्येचा उद्योग, त्याचप्रमाणे रावणाची दुष्टता वगरे हकी- कत ऐकून त्यांना फार वाईट वाटले. सीतेने दिलेला चूरामणि ओ- ळखून रामचंद्राच्या नेत्रातून अश्रुधारा वाहूं लागल्या.
सीतेचा शोध आणि समाचार कळण्याचाच काय तो अवकाश होता. रामचंद्रांनी लागलेच लंकेवर स्वारी करण्याची सुग्रिवाला आज्ञा केली. बोलता बोलतां युद्धाची तयारी झाली. किष्किवेच्या सुग्रीव राजानें आपल्या सर्व सेनेला लंकेवर चढाई करून जाण्यास सागितले. त्याप्रमाणे सर्व सेनापति आपापली सैन्य घेऊन दक्षिण दिशेकडे चालले.
 जेव्हां रामचंद्र सैन्यासह समुद्रावर जाऊन पोहोंचले, तेव्हां त्यांना समुद्र ओलांडून पार करें जावें याबद्दल चिंता वाटू लागली. ते मग त्याबद्दल उपाय योजूं लागले.
 तिकडे रावणाला जेव्हां रामचंद्राचे सैन्य येत आहे म्हणून वा- तमी लागली, तेव्हां तो ही आपल्या ठिकाणीं घाबरून गेला. त्यानें आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावून आणून आतां काय करावें म्हणुन