१७३
हातांत टाकिली. ' आपल्याला विश्वास वाटावा म्हणून त्यांनी ही आंगठी दिली आहे.' असे तो म्हणाला. अंगठीवर ' राम ' हीं अक्षरें खोदली होती. ती अंगठी ओळखतांच सीतेला अत्यंत हर्ष होऊन ती तिच्याकडेच एकसारखी पाहत राहून दुःख करूं लागली.
सीतेला अत्यंत दु:खी पाहून हनुमानानें तिला आपल्या पाठी- वर बरुवून लंकेतून रामाजवळ घेऊन जाण्याची इच्छा दर्शविली.. पण हा त्याचा विचार तिला आवडला नाहीं. त्याची कारणें अनेक होती. पहिले कारण, ती फार भीरु स्वभावाची होती. पाठीवरून निसटून समुद्रांत पडले तर कसे होईल. दुसरे कारण, राक्षसांनी त्याला घेऊन जातांना पाहिले म्हणजे ते हनमानाबरोबर युद्धाला येतील, मग त्यानें त्यांच्याशी युद्ध करावे किंवा तिचें रक्षण करावें. त्या युद्धांत जर राक्षसांना जय आला तर अधिकच अनर्थ हाणार.. तिसरे कारण, सीता मोठी पतिव्रता स्त्री होती. ती परपुरुषाचा स्पर्श होणे अगदी अनुचित समजत असे. येथें कोणी शंका घेतील की रावणाने जेव्हां तिला हरण करून नेलें, तेव्हां तर तिला पर- पुरुषस्पर्श झालाच होता कीं नाहीं ? त्याचें • सीता त्या वेळी परस्वाधीन होती.' हेंच उत्तर आहे पण तो प्रकार येथें नाहीं... आपत्काल सर्व धर्म शिथिल असतात. चौथें कारण हैं होतें कीं, हनुमान जर सीतेला घेऊन गेला असता, तर रावणाला त्याच्या दुष्कृत्याबद्दल कांहींच शिक्षा मिळाली नसती. रामचंद्राची सुवीरता जगाला दिसली नसती. नेहमी लोक म्हणाले असते की याला आपल्या स्त्रीला देखील सोडवितां आलें नाहीं. याचा हा भित्रेपणाच होय.' याप्रमाणे सीतेनें आपल्या असंमतीची कारणें दाखविलीं. हीं ऐकून हनुमानाला तिच्या धार्मिक शुद्धतेबद्दल, आणि दूरदर्शी - पणाबद्दल आनंद वाटला. त्याने त्याबद्दल तिची प्रशंसा केली. तो